घरमहाराष्ट्रनागपूर"मला त्यांच्या बोलण्याने..."; संजय राऊतांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“मला त्यांच्या बोलण्याने…”; संजय राऊतांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत यांच्या बोलण्याचे मला वाईट वाटत नाही मग तुम्हाला का वाईट वाटते, असे मत यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदार संघाबाबत माहिती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण याचवेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत यांच्या बोलण्याचे मला वाईट वाटत नाही मग तुम्हाला का वाईट वाटते, असे मत यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. तसेच सध्याच्या सर्वेनुसार मुंबई महानगरपालिकांमध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळत असल्याची माहिती देखील यावेळी त्यांच्याकडून देण्यात आली तसेच त्यांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य देखील केलेले पाहायला मिळाले.

हेही वाचा – धरणामध्ये XXXपेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची अजित पवारांवर खालच्या पातळीवर टीका

- Advertisement -

संजय राऊत यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच थुंकण्याची ॲक्शन केली. त्यांनंतर राज्यातील अनेक राजकारण्यांनी याबाबद्दल संताप व्यक्त केला. तर पक्षाच्या नेत्यांनी तार्तम्य बाळगावे आणि आपले मत व्यक्त करावे, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. अजित पवारांच्या या मताला प्रतित्युत्तर देत संजय राऊत म्हणाले की, धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं अशी खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे या टीकेवरून आता दोघांमध्ये पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

परंतु नागपूर दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता, ते म्हणाले की संजय राऊत मोठे नेते आहेत. आज राज्यसभेचे मेंबर आहेत. जर का माझच त्याबद्दल काही म्हणणे नसेल तर तुम्हाला का वाईट वाटत आहे आणि जर माझ्या कार्यकर्त्यांना वाईट वाटत असेल तर मी त्यांना समजावून सांगतो असे म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.

- Advertisement -

राज्यात ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. परंतु नेहमीच या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचेच दिसून येते. या तिन्ही पक्षातील नेते हे कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून एकमेकांवर टीकाटिप्पणी करताना दिसून येत असतात. पक्षाचे नेते पक्षामध्ये सगळं काही सुरळीत सुरू असल्याचे सांगत असले तरी महाविकास आघाडी मधील काही नेत्यांच्या वागणुकीवरून तरी आघाडीमध्ये बिघाडी तर होणार नाही ना अशीच संभावना व्यक्त करण्यात येत आहे. याआधी देखील अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद पाहायला मिळालेला होता. त्यामुळे अजित पवार आणि संजय राऊत यांच्या मधला कलगीतुरा पुन्हा एकदा सुरू झाल्याने आता अजित पवारांच्या या उत्तरामुळे नक्कीच संभ्रम निर्माण होत आहे. कारण संजय राऊत यांचे नेहमीच काहीतरी विचित्र बोलणे हे महाविकास आघाडीमध्ये मोठे बिघाडी करण्याची शक्यता वर्तवित असते. त्यामुळे आता संजय राऊत आणि अजित पवार हे जरी आमच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे असं म्हणत असले तरी पुढे या वादाचे नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -