घरमनोरंजन‘आदिपुरूष’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; 'पठाण'चा मोडणार रेकॉर्ड

‘आदिपुरूष’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; ‘पठाण’चा मोडणार रेकॉर्ड

Subscribe

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता केवळ 6 दिवस बाकी असून आजपासून (10 जून) चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालं आहे. प्रेक्षक मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची वाट पाहत होते.

‘आदिपुरूष’ भारतात 6200 स्क्रिन्सवर होणार प्रदर्शित

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आदिपुरूष’ चित्रपट भारतात जवळपास 6200 स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. तर हिंदी भाषेत हा 4000 पेक्षा जास्त स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या पठाण पेक्षा अधिक कमाई करेल असं म्हटलं जात आहे. हा चित्रपटा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय हा चित्रपट तयार करण्यासाठी 600 कोटी खर्च करण्यात आले आहेत.

- Advertisement -

रणबीर करणार 10 हजार तिकिटं खरेदी

मागील एक-दोन दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर देखील या चित्रपटाची 10 हजार तिकिटं खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही तिकिटं तो अनाथ मुलांमध्ये वाटणार आहे. रणबीर व्यतिरिक्त ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाचे निर्माते देखील या चित्रपटाची तिकिट खरेदी करुन ही तिकिटं सरकारी शाळेतील मुलांना तसेच वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमामध्ये ही वाटण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे हक्क ‘आदिपुरुष’ने तेलुगु थिएटरला जवळपास 170 कोटींना विकले आहेत. शिवाय या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी देखील कमाई केली आहे.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : तो माझे अश्रू पुसतो… भावनिक कॅप्शन लिहितं इलियानाने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा नवा फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -