घरमहाराष्ट्रडॉ. आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा

डॉ. आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा

Subscribe

डॉ. आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत विशेष न्यायालयाने त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले होते.

डॉ. आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत विशेष न्यायालयाने त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र येथील न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवार, ४ फेब्रुवारी रोजी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज, मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत हायकोर्टाने त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत संरक्षण दिले आहे.

- Advertisement -

पुणे पोलिसांना मिळाला झटका 

पुणे पोलिसांनी एल्गार परिषद तसेच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास करताना नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून डॉ. तेलतुंबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. डॉ. तेलतुंबडे यांच्यावर ११ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर डॉ. तेलतुंबडे यांनी त्यांचे वकील अ‍ॅड. रोहन नहार आणि अ‍ॅड. पार्थ शहा यांच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश किशोर वडणे यांच्या कोर्टा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना केरळहून परतल्यानंतर अटक केली होती. तसेच शनिवारी तत्काळ विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र विशेष न्यायालयाने त्यांची अटक अवैध असल्याचा निर्वाळा दिला होता.

हेही वाचा – 

आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध; कोर्टाचा निर्वाळा

- Advertisement -

हे षडयंत्र आहे, यात तथ्य नाही – डॉ. आनंद तेलतुंबडे

अर्बन नक्षलवादाचा बुरखा घालून सरकारची दडपशाही – डॉ. आनंद तेलतुंबडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -