घरदेश-विदेशPulwama attack : दहशतवादी हल्ल्याचे पडसाद; गृहमंत्री जाणार काश्मीरला

Pulwama attack : दहशतवादी हल्ल्याचे पडसाद; गृहमंत्री जाणार काश्मीरला

Subscribe

पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आपले ४४ जवान शहीद झाले असून त्या घटनेनंतर संपूर्ण देशात संपाताची लाट आहे. यासंबंधी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आपले ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली असून त्या घटनेनंतर संपूर्ण देशात संपाताची लाट आहे. इतक्या भंयकर घटनेनंतर केंद्रातही खलबती सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक होणार असून या बैठकीला संरक्षण, परराष्ट्र, अर्थ आणि गृह खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक सकाळी ९.१५ वाजता गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीर परिसरातील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

वाचा – Pulwama attack: पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

- Advertisement -

सुरक्षा यंत्रणेची महत्त्वाची बैठक 

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदने केलेल्या हल्याचा देशभरातून निषेध नोंदवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज, शुक्रवारी काश्मीरला जाणार आहेत. राजनाथ सिंग हे श्रीनगरला जाणार असून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर वरिष्ठ सुरक्षा आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कृतीबाबत आढावा घेतील. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची आज, शुक्रवारी सकाळी बैठक होणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला.

वाचा – दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

- Advertisement -

वाचा – दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते तब्बल २५०० सीआरपीएफ जवान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -