घरदेश-विदेशमाहितीये का, जगातील सगळ्यात जास्त वय असलेली महिला भारतात

माहितीये का, जगातील सगळ्यात जास्त वय असलेली महिला भारतात

Subscribe

पंजाब राज्यात राहणाऱ्या ११८ वर्षाच्या करतार कौर या जगातील सगळ्यात जास्त वयोवृद्ध असेलेल्या महिला ठरल्या आहेत.

एका भारतीय महिलेने जगातील सर्वात जास्त वयोवृद्ध महिला असण्याचा मान मिळवला आहे. पंजाबच्या लुधियाना येथील करतार कौर या ११८ वर्षांच्या जगातील सगळ्यात जास्त वयस्कर महिला ठरल्या आहेत. आजच्या या २१ व्या शतकात माणूस ६० वर्ष जगला तरी पुष्कळ असे म्हटले जाते. अशातच करतार कौर यांनी वयाची शंभरी ओलांडून पुढची १८ वर्षे लोटली आहेत. दरम्यान, त्यांच्या या वयाच्या विक्रमाने त्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांच्या या वयाच्या विक्रमाची दखल ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ यांनी घेतली असून लवकरच त्यांची नोंद केली जाणार आहे.

१९०१ साली झाला जन्म

करतार यांचा जन्म १९०१ साली झाला. त्यांच्या वयाची चाचपणी त्यांच्या भावाच्या वयावरुन करण्यात आली आहे. करतार कौर यांच्या पंतूला आपली पणती या जगातील सगळ्यात जास्त वय असलेली महिला असल्याची माहिती होती. मात्र आपल्या पणतीला कोणाची नजर लागू नये यासाठी आपण सदरची गोष्ट लपवून ठेवली, असे तो सांगतो. करतार यांच्या मुलीचे वय आजच्या घडीला ८८ वर्षे इतके आहे. आपल्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासात त्यांनी कौर खानदानाच्या तब्बल पाच पिढ्या पाहिल्या आहेत. त्यांनी आपली नातवंडे आणि नातवंडांची पतवंडे देखील पाहिली आहेत. पंजाबी असून देखील विशेष म्हणजे त्या पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहेत.

- Advertisement -

या वयात हार्ट सर्जरी

या वयात करतार यांच्यावर हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच फिरोजपूरमधील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. रवींद्र सिंह कूका यांनी करतार यांच्यावर यशस्वी हार्ट सर्जरी केली आहे. करतार कौर यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्जरी नंतर करतार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान कौर यांच्या वयाच्या विक्रमा बरोबरच सर्वाधिक वयस्कर व्यक्तीवर सर्जरी करण्याचा विक्रम देखील डॉ. सिंह यांच्या टिमने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -