घरदेश-विदेश'टिपू सुलतान' यांच्या बंदूकीचा लिलाव, जाणून घ्या किती लागली बोली

‘टिपू सुलतान’ यांच्या बंदूकीचा लिलाव, जाणून घ्या किती लागली बोली

Subscribe

टिपू सुलतान यांच्या चांदीच्या तलवारीचा लिलाव सोहळा नुकताच लंडन येथे पार पडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात टिपू सुलतान यांची फ्लिंटॉक बंदूकीला विकत घेण्यासाठी लोकांनी उत्सुकता दाखवली.

ऐतिहासीक वस्तू विकत घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात नेहेमी लोकांची उत्सुकता बघायल मिळते. अनेकजण यावस्तू स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी विकत घेतात तर काही यांची पूर्नविक्री करण्यासाठी करतात. भारतीय ऐतिहासीक वस्तूंची मागणी हे आतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आहे. भारताचा इतिहास हा इतर देशांच्या इतिहासाहून वेगळा आहे यासाठी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विदेशी पर्यटक भारतात येतात. परदेशात भारतीय वस्तूंचा लिलाव केला जातो. ब्रिटिश काळात भारतातून अनेक वस्तू परदेशात गेल्या या वस्तूंचा आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लिलाव होत आहे. टिपू सुलतान म्हणजे ‘टायगर ऑफ मैसूर’ यांच्या शस्त्रांचा लिलाव नुकताच लंडन येथे झाला. त्यांच्या शस्त्रांना विकत घेण्यासाठी लोकांनी उत्सुकता दाखवली आहे.

किती लागली बोली

टिपू सुलतान यांच्या शस्त्रांचा लिलाव लंडन येथे करण्यात आला. लंडनमधील बर्कशायर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावात टिपू सुलतान यांची चांदीची बंदूक आणि सोन्याच्या तलवारीचा समावेश होता. या बंदूकीचा वापर मैसूरच्या लढाईत करण्यात आला होता. ही बंदूकीमध्ये चांदीचा वापर करण्यात आला आहे. या शस्त्रांना विकत घेण्यासाठी १ लाख ७ हजार पाऊंडची बोली लावण्यात आली. टीपू सुलताना यांच्या बंदूकीची किंमत ६० हजार पाउंड (५४.७४ लाख रुपये) लावण्यात आली. ही बंदूक युद्धाच्या मौदानावरूनच उचलली असल्याने या बंदूकीचे नुकसान झाले आहे. याच बरोबर सोन्याची तलवार १८ हजार ५०० पाउंड (१६ लाख रुपये) किमतीत विकल्या गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -