घरमहाराष्ट्रअजित पवार यांची लाडक्या 'लेका'साठी भर उन्हात रॅली

अजित पवार यांची लाडक्या ‘लेका’साठी भर उन्हात रॅली

Subscribe

मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्ष्याचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

एकीकडे शहराचे तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस च्या जवळपास असून लोकसभेचे राजकारण तापण्यास सुरू झाले. मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्ष्याचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे वडील अजित पवार आणि सुपुत्र उमेदवार पार्थ पवार हे एकाच जिप्सीमधून रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान, पवार कुटुंब हे पार्थ यांचा प्रचार करण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसत असून भर उन्हात अजित पवार हे प्रचार करताना दिसत आहेत.

दोघे एकाच जिप्सीमधून रॅलीत सहभागी

निगडीच्या भक्ती शक्ती शिल्पाचा आशीर्वाद घेऊन अजित पवार आणि पार्थ पवार यांनी रॅलीला सुरुवात केली. यावेळी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार आणि पार्थ हे दोघे एकाच जिप्सीमधून रॅलीत सहभागी झाले. रस्त्याने प्रत्येक व्यक्तीला अजित पवार हे नमस्कार करत होते. दरम्यान, अजित पवार यांनी सुपुत्र पार्थ पवारसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे.

- Advertisement -

पार्थच्या प्रचारासाठी कंबर कसली 

गेल्या काही महिन्यांपासून पवार कुटुंबातील आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार, भाऊ जय पवार, चुलत भाऊ रोहित पवार आणि अजित पवार यांची बहीण हे सर्व पिंपरी-चिंचवडमध्ये बैठका घेत असून पार्थचा प्रचार करत आहेत. हे सर्व पाहता पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. अजित पवार हे स्वतः विरोधक असू की सामान्य नागरिक, कार्यकर्ता याच्याशी फोनद्वारे संपर्क साधत आहेत. एकीकडे विरोधक विद्यमान खासदार आणि शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे हे पार्थ पवार यांच्या विरोधात बोलणे टाळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -