घरमहाराष्ट्रनाशिककरंजाडला पेट्रोल पंपावर जबरी लूट

करंजाडला पेट्रोल पंपावर जबरी लूट

Subscribe

बागलाण तालुक्यातील करंजाड येथील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील बालाजी पेट्रोलियमवर शनिवारी, २० एप्रिलला रात्री साडेनऊच्या सुमारास दोन लुटारुंनी पंपावरील कर्मचार्‍यांवर हल्ला चढवत अंदाजे ५० ते ६० हजारांची लूट केली.

बागलाण तालुक्यातील करंजाड येथील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील बालाजी पेट्रोलियमवर शनिवारी, २० एप्रिलला रात्री साडेनऊच्या सुमारास दोन लुटारुंनी पंपावरील कर्मचार्‍यांवर हल्ला चढवत अंदाजे ५० ते ६० हजारांची लूट केली. जायखेडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

करंजाड येथील करंजाड-ताहराबाद रस्त्यावर देवरे यांच्या मालकीचा भारत पेट्रोलियमचा पंप आहे. या पेट्रोलपंपावर रात्री साडेनऊच्या सुमारास दोन लुटारू पल्सरवरून आले. त्यांनी कर्मचार्‍यांना धारदार कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्या रोकड हिसकावून पोबारा केला. कर्मचार्‍यांनी तत्काळ जायखेडा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याआधारे संशयितांचा तपास करण्याच्या सूचना व वरिष्ठांना घटनेची माहिती देत तातडीने नाकाबंदी करून संशयितांचा कसून शोध घेतला. मात्र, संशयित अंधराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, चोरट्यांनी नेमकी किती रक्कम लुटली, याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. जायखेडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

तालुक्यातील दुसरी घटना

गेल्या महिन्यात बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील उद्धवेश पेट्रोलपंपावर रात्री आठ ते नऊच्या सुमारास पल्सर या दुचाकीवरून आलेल्या आणि काळे हेल्मेट परिधान केलेल्या दोन तरुणांनी पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये प्रवेश करून व धारदार कोयत्याचा धाक दाखवून ४६ हजार रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. त्याचपार्श्वभूमीवर करंजाड येथील पेटोलपंपावर झालेली चोरी. आधीच्या गुन्ह्यातील चोरट्यांकडे असलेली दुचाकी, शस्र आणि या गुन्ह्यातील चोरटे यांचेकडील साधने जवळजवळ साम्यच आहे. तेव्हाही दोनच चोरटे आणि आताही दोनच चोरटे. यावरूनच स्पष्ट होते की, मुल्हेर येथील चोरटे आणि करंजाड येथील चोरटे हे एकच असण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. ते केवळ पेट्रोलपंपावरच चोरी करतात, हेही स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -