घरहिवाळी अधिवेशन २०१८२६/११ हल्ल्यातील शहिदांचा सरकारला विसर- अजित पवार

२६/११ हल्ल्यातील शहिदांचा सरकारला विसर- अजित पवार

Subscribe

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण होत आहे आणि राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरू आहे. मात्र शहिदांना मानवंदना देण्याचा विसर राज्य सरकारला पडला असल्याने सरकारच्या असंवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे, अशी जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.

२६/११ हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र शहिदांना मानवंदना देण्याचा विसर राज्य सरकारला पडला असल्याने सरकारच्या असंवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे, अशी जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. आजपासून हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे.

हेही वाचा – आरक्षणाबाबत निर्णय घेता येत नसल्याने सरकार पळ काढतेय – अजित पवार

- Advertisement -

विरोधकांच्या आक्रमकपणामुळे शहिदांना मानवंदना

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण होत आहे आणि राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरू आहे. अशावेळी सरकारतर्फे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्यांना आणि मृत्यमुखी पडलेल्या लोकांना सभागृहात आदरांजली अर्पण करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता आज विधानसभेचे कामकाज सुरू करण्यात आले त्यावर पवार यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत शहिदांना सभागृहात मानवंदना देण्यात यावी अशी मागणी केली. २६/११चा हल्ला अत्यंत क्रुर आणि दुर्दैवी होता. सरकारने जवानांच्या व मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्याप्रति सदभावना व्यक्त करावी, अशी मागणी पवार यांनी केली. विरोधकांच्या आक्रमकपणामुळे सरकारने मागणी मान्य करत सभागृहात शहिद जवानांना तसेच मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मानवंदना दिली.


हेही वाचा – दोन्ही अहवाल सभागृहासमोर ठेवा तरच सभागृह चालू देऊ – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -