घरCORONA UPDATELIVE UPDATES: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं ६५ व्या वर्षी निधन

LIVE UPDATES: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं ६५ व्या वर्षी निधन

Subscribe

कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घ्या.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते.


गेल्या २४ तासांत राज्यात २१ हजार २९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४७९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट वाढत असून ७५.६५ टक्के एवढा झाला आहे. हेही वाचा

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर हातकणंगले तालुक्यातील रुई या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशालता वाबगावकर यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी सरोज सुखटणकर यांचं निधन झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सरोज सुखटणकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


मुंबईत आज २३६० नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १८८४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १९०१३८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १५४०८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर २७०६३ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत ८६०१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

mumbai corona report


सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्स कनेक्शनमध्ये बरीच मोठी नावे समोर आली आहेत. दरम्यान, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांना समन्स पाठविण्यात आलं आहे. ७ जणांना समन्स पाठविण्यात आला आहे. दीपिका पादुकोणची २५ सप्टेंबर रोजी चौकशी केली जाणार आहे. तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना २६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. रकुल प्रीत आणि सीमोन खंबाटा यांना उद्या बोलविण्यात आलं आहे.


महापालिका आपात्कालीन विभागात जाऊन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आदित्य ठाकरेंसोबत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल देखील उपस्थित होते. पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ८ ते १२ तासात जवळपास ३८२ मीमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. मुंबईकरांसाठी योग्य पावलं उचलली जातील, शिवाय मुंबईच्या महापौर किशोरी ताई पेडणेकर यांच्याशी देखील चर्चा झाली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


कंगना ड्रग्ज घेत होती तर तिचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. जो न्या इतरांना तोच कंगनाला, असं दरेकर म्हणाले.


पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा समावेश

२०२० या वर्षाची जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी टाइम मॅगझिनने प्रसिद्ध केली आहे. टाइम मॅगझिनकडून दरवर्षी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली जाते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. (सविस्तर वाचा)


शिवसेनेत शोककळा

कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
त्यांच्या जाण्याने कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. तर देवळेकर यांच्या निधनाबाबत सर्वपक्षीय राजकारणी, लोकप्रतिनिधीनी शोक व्यक्त केला आहे.


बाधितांची संख्या ५६ लाखांपार!


मंगळवारी दिवसभरात ९ लाख ५३ हजार ६८३ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून देशात आतापर्यंत ६ कोटी ६२ लाख ७९ हजारांहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती इंडियन कॉऊन्सलिंग ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिली आहे.


आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद राहणार आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.


मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.


मुंबईतील बरीच ठिकाणं जलमय


मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील काही भागात पाणी साचले. त्यापैकी किंग सर्कल परिसरातील हे दृश्य


भिवंडीतील पटेल कम्पाऊंड परिसरात रविवारी मध्यरात्री तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून आज, बुधवार सकाळपर्यंत येथील मृतांचा आकडा ३३ वर पोहोचला आहे. याबाबतची माहिती एनडीआरएफ टीमने दिली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमचे बचावकार्य अद्यापही सुरू असून ढिगाऱ्याखालील शोध मोहिम सुरू आहे. (सविस्तर वाचा)


राज्यातील रिकव्हरी रेट ७५.३६ टक्क्यांवर!

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे राज्यातील रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ७५.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १८ हजार ३९० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात २० हजार २०६ रुग्ण बरे होऊ गेले घरी आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख ४२ हजार ७७०वर पोहोचला. यापैकी आतापर्यंत ३३ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -