घरCORONA UPDATECorona Live Update: २४ तासांत राज्यात ५ हजार २४ नव्या रुग्णांची भर

Corona Live Update: २४ तासांत राज्यात ५ हजार २४ नव्या रुग्णांची भर

Subscribe

उल्हासनगरच्या नगरसेवकांना कोरोनाची लागण

उल्हासनगर महापालिकेच्या चार नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये स्थायी समिती सभापतींच्या देखील समावेश झाला आहे. कोरोनाने उल्हासनगर शहरातील ७० पेक्षा अधिक भागांमध्ये संक्रमण सुरू केले असून गुरुवारच्या १२९ रुग्णांमुळे उल्हासनगर क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १४०६ झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापती राजेश वधारिया याना कोविडची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यांनी ही दुजोरा देत घरात क्वारांटाईन होत उपचार सुरू केल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे एक शिवसेना नगरसेवक आणि एका नगरसेविकेच्या पतीला ही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एका भाजप नगरसेवकाला ही कोरोना लक्षणे दिसून लागल्यावर त्याने होम क्वारांटाईन होत उपचार घेतले असल्याचे समजते. तसेच उल्हासनगर मधील एका रिपाई नेत्याला ही कोरोना लागण झाली असून तो नेता नवी मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या पूर्वीच उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या ३० पेक्षा अधिक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकानाही कोरोनाची लागण झाली आहे.  गुरुवारी दुपारी नवनियुक्त आयुक्त डॉ. दयानिधी यांनी पदभार स्वीकारला. याच दिवशी रात्री आलेल्या अहवालानुसार उल्हासनगर शहरात १२९ रुग्ण आढळल्याने डॉ. दयानिधी यांची कोरोना परिक्षा घेणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार २४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १ लाख ५२ हजार ७६५ इतका झाला आहे. आजपर्यंत एका दिवसात वाढलेले हे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. याशिवाय राज्यात गेल्या ४८ तासांमध्ये ९१ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. त्याशिवाय नॉन कोविड म्हणून नोंद झालेल्या ८४ मृत्यूंचा देखील समावेश आता कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आज १७५ मृतांची वाढ झाली आहे. एकूण मृतांचा आकडा ७ हजार १०६ इतका झाला आहे. आज दिवसभरात २ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ७९ हजार ८१५ इतका झाला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात १३ हजार ९४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३६ जणांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तर रिकव्हरी रेट ५८.२४ इतका झाला आहे.

- Advertisement -

ठाणे पोलीस आयुक्तलयातील ३६५ जणांची वैद्यकीय तपासणी; २५ संशयितांचे स्वब घेण्यात आले

लॉकडाऊनच्या काळात मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यापासून ते गरिबांना अन्नधान्य वाटप करण्यापर्यंत नागरिकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या ठाणे पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची  वैद्यकीय तपासणी शुक्रवारी ठाणे पोलीस आयुक्तलयात पार पडली. एका दिवसात ठाणे पोलीस आयुक्तलयातील सुमारे ३६५ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली असून करोना संशयित असणाऱ्या २५ पोलीस आणि कार्यालयीन कर्मचारी यांचे स्वाब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तलयातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ९ जुलै पर्यंत टप्प्याटप्प्याने या तपासण्या सुरू असणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सांगितले.


कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे आजपासून १ जुलै पर्यंत भाजीपाला, फुल मार्केट बंद करण्याचा कल्याण बाजार समितीने निर्णय घेतला आहे.


वसईत आज, शुक्रवारी दिवसभरात करोनाने कहर केला असून एकट्या वसई विरार महापालिका हद्दीत तब्बल ३५८ रुग्ण आढळून आले असून त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला. तर वसई ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळून आले आहेत. तर महापालिका हद्दीत करोना रुग्णांची संख्या ३ हजार झाली असून त्यातील १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या १३४ वर गेली असून त्यातील ६ जण मृत्यू पावले आहेत.


एकिकडे कोरोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे चेहऱ्यावर मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या नागरिकांविरोधात  पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून, त्यांच्याकडून पाचशे रूपये दंड वसूल करण्यात आला आहे, गेल्या दोन दिवसात पालिकेने  नागरिकांकडून तब्बल १ लाख ३५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महापालिका क्षेञात राहणा-या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेह-यावर मास्‍क, रूमाल परिधान न केल्‍यास ५०० रूपये दंड आकारणीचा आदेश महापालिकेने जारी केलेला आहे. महापालिका क्षेत्रात स‌दयस्थितीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे व नागरिक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळुन आल्‍यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार चेह-यावर मास्क न लावणाया व्यक्तीविरुध्द सर्व प्रभाग क्षेत्रात जोरदार मोहिम उघडण्यात आली असून अ प्रभागात मास्क परिधान न करणाया लोकांकडून ७ हजार रूपये, , ब प्रभागात रू.६७ हजार ५००,  क प्रभागात रु १९ हजार ९५०, ड प्रभागात रु.१४ हजार ५००,  जे प्रभागात रु. ८ हजार , फ प्रभागात रु १८ हजार रूपये, आणि आय प्रभागात रु. ५०० रूपये असा एकुण रु.१ लाख ३५ हजार ४५०  इतका दंड दोन दिवसात  प्रभाग क्षेत्र अधिका-यांनी तेथील स्थानिक पोलिस स्टेशनच्या सहकार्याने वसुल केला आहे. हि मोहिम अशीच पुढे सुरू ठेवण्याचे आदेश  पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.


दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात १९३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये १०९ पुरुष आणि ८४ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ४९२वर पोहोचला असून २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


काल २ लाख १५ हजार ४४६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ७७ लाख ७६ हजार २२८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने दिली आहे.


औरंगाबादमधील बजाज कंपनीत ७९ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बजाजकडून २ दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा


देशात सतत कोरोनाबाधित नव्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांत देशात १७ हजार २९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ९० हजार ४०१वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत १५ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ लाख ८९ हजार ४६३ जणांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा


उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये आतापर्यंत २५ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांवर पोहोचला आहे.


मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तीन कोविड केंद्र सुरू केली आहेत. कोले कल्याण, मरोळ आणि मरीन ड्राइव्ह येथे ही तीन कोविड केंद्र उभारण्यात आली आहेत. तीन केंद्रांची एकत्रित क्षमता सुमारे १००० बेड्सची आहे, अशी माहिती मुंबई पोलीस पीआरओ प्रणय अशोक यांनी दिली.


कालपर्यंत मुंबई अग्निशमन दलांतील ११७ जवानांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. यापैकी ८० जवानांना डिस्चार्ज देण्यात आला असून ८ जवानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -