घरCORONA UPDATECorona Live Update:Corona Update: राज्यात २४ तासांत ६,७४१ नव्या रूग्णांची नोंद; २३१...

Corona Live Update:Corona Update: राज्यात २४ तासांत ६,७४१ नव्या रूग्णांची नोंद; २३१ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत आज कोरोनाचे ९६९ नवे रुग्ण

मुंबईमध्ये कोरोनाचे ९६९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ८६३ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५४०२ वर पोहचला आहे. आज दिवसभरात मुंबईमध्ये तब्बल १ हजार ११ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ६६ हजार ६३३ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -


राज्यात २४ तासांत ६,७४१ नव्या रूग्णांची नोंद

- Advertisement -

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ५०० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)


स्वदेशी दोन लसींची मानवी चाचणी सुरु

देशात लवकरच कोरोनावर लस येणार असून ही लस विकसित करण्यासाठी भारत जलदगतीच्या मार्गावर आहे. –  आयसीएमआर (सविस्तर वाचा)

https://twitter.com/ani_digital/status/1283025567294590977

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या वाहन चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते होम क्वारंटाईन झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.


नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवाला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सविस्तर वाचा 


अहमदनगर काल दिवसभरात ७२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा एकूण १ हजार ३५वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ६४९ रुग्ण बरे झाले असून २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


काल दिवसभरात नाशिकमध्ये कोरोनाचे २५७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजार २५९वर पोहोचला आहे. तसेच काल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मृतांचा आकडा ३३२वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ४ हजार ७८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


पुण्यात रात्रीतून २५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० हजार ८७वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १ हजार ९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २५ हजार ४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


देशात २४ तासांत २८ हजार ४९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाख पार झाला आहे. तसेच सध्या ३ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा 


औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ६८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजार ८८२वर पोहोचला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५ हजार २२९ रुग्ण बरे झाले असून ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


रत्नागिरीत आणखी ३५ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातला एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९१२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६२७ जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.


संपूर्ण जगात कोरोनाचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगात १ कोटी ३२ लाख ३५ हजार ७५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५ लाख ७५ हजार ५२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७६ लाख ९६ हजार ३८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


सोमवारी ६ हजार ४९७ नव्या रुग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १९३ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६० हजार ९२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -