घरताज्या घडामोडीरोह्यात सकाळची बांग भोंग्याविनाच, मनसेकडून शांत वातावरणात हनुमान चालीसा पठण

रोह्यात सकाळची बांग भोंग्याविनाच, मनसेकडून शांत वातावरणात हनुमान चालीसा पठण

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत तर त्यासमोर हनुमान चालीसा पठण करा असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानुसार तालुक्यातील शांततामय वातावरण अबाधित रहावे यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनास मुस्लिम समाजबांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शहरासह तालुक्यातील सर्व मशिदीमध्ये सकाळची बांग भोंग्याविना करण्यात आली. त्यानंतर शहरातील राम मारुती चौकातील मारुती मंदिरात मनसेकडून आरती व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक प्रमोद बांगर यांचे नेतृत्वाखाली खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत ३ तारखेला साजरी होणाऱ्या ईद नंतर मशिदींवरील भोंगे राज्यशासनाने न उतरवल्यास हनुमान चालीसा पठण करा असे आवाहन मनसैनिकांसह नागरिकांना केले होते. राज्यात याचे कमी अधिक तीव्र पडसाद उमटत असतानाचा रोहा शहर व तालुक्यात यामुळे सामाजिक शांतता भंग होणारा प्रसंग उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस निरिक्षक प्रमोद बांगर यांनी मुस्लिम समाजातील सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ३ मे रोजी बैठक घेत ४ तारखेची सकाळची बांग ही विना भोंगा देत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास समस्त मुस्लिम समाजाने प्रतिसाद देत तालुक्यातील सर्वच मशिदीमधून ४ तारखेची पहाटे ५ ची बांग ही भोंग्या वरुन देण्यात आली नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते  अल्ताफ चोरडेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

रोहा शहर व तालुका मनसे तर्फे राम मारुती चौकातील मारुती मंदिरात महाआरती व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. रोहा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांचे परवानगीने मनसे रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर, तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे, शहराध्यक्ष मंगेश रावकर, उपशहराध्यक्ष अमित पवार, कुंजन भोकटे, महेश वाडकर, सुरज मुटके, सुमित कांबळे, राकेश लुमण आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आरती व हनुमान चालीसा पठण करण्यात आले.

अमोल पेणकर – जिल्हा सचिव मनसे

कायदा सुव्यवस्था राखत कोणत्याही समाजाची भावना न दुखवता आदरणीय आमचे नेते राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरुन रोहयातील मारुती मंदीरात हनुमान चालीसा पठण करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : आरबीआयचा कर्जदारांना मोठा झटका; गृह, वाहन कर्ज महागणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -