घरअर्थजगतPost Office च्या 'या' दोन योजना देतायंत FD पेक्षा अधिक व्याज; वाचा...

Post Office च्या ‘या’ दोन योजना देतायंत FD पेक्षा अधिक व्याज; वाचा सविस्तर

Subscribe

लॉकडाऊन दरम्यान बऱ्याच लोकांना गुंतवणुकीची चिंता सतावत आहे. आपल्याजवळ असलेला पैसा नेमका कुठे गुंतवावा, योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचा फायदा चांगलाच होईल. याचाच सगळे विचार करत आहेत. मात्र गुंतवणूक करताना जास्त नफा कशा पद्धतीनं मिळवता येईल, याचाच गुंतवणूकदार जास्त विचार करतात. पैसै गुंतवणूक करण्यासाठी फिक्स डिपॉझिट (एफडी) हा गुंतवणूकीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. जर तुम्हाला एफडीपेक्षा अधिक मुदत परत हवी असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. या दोन योजना म्हणजे किसान विकास पत्र (KVP) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आहेत. या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करून आपण ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवरील कर वाचवू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया ठराविक ठेवींवर जास्तीत जास्त ५.४ % व्याज मिळेल. या दोन योजनांविषयी जाणून घ्या सविस्तर

किसान विकास पत्र योजना 

हे एक असं प्रमाणपत्र आहे जे कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. बाँडप्रमाणेच ही कागदपत्र जारी केली जातात. यावर चांगलं व्याज मिळतं. तसेच या योजनेवरील व्याजाचे दर सरकार वेळोवेळी बदलत असते. ही योजनेअंतर्गत देशातल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडता येऊ शकते.

- Advertisement -
  • या योजनेत सध्या ६.९ % व्याज मिळत आहे.
  • कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही. मात्र किमान गुंतवणूक १००० रुपये आवश्यक
  • गुंतवणूकदाराचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुले या योजनेत सामील होऊ शकतात
  • सिंगल खात्याशिवाय जॉईंट खात्याची सुविधा उपलब्ध
  • अडीच वर्षाचा लॉक इन पीरियड. म्हणजेच गुंतवणूकीची रक्कम काढण्यासाठी किमान अडीच वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.
  • त्याअंतर्गत जमा केलेली रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत करातून सूट देण्यात आली आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC )

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत तुम्ही फर्त अल्प प्रमाणात गुंतवणूक करू शकता आणि काही वर्षांत चांगला नफा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं पूर्णपणे सुरक्षित असल्याने, अशा परिस्थितीत आपण कोणत्याही जोखीमशिवाय इथं गुंतवणूक करू शकता. या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेची मुदतपूर्ती ५ वर्षे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाच्या गरजांसाठी तुम्ही अटी आणि नियमांचं पालन करत १ वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतरही तुमची रक्कम काढू शकता. आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील व्याज दर सरकार ठरवते.

  • NSC मधील गुंतवणूकीवर दरवर्षी ६.८ % व्याज मिळते.
  • यामध्ये व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते, परंतु व्याज रक्कम गुंतवणूकीच्या कालावधीनंतरच दिली जाते.
  • या योजनेत किमान १००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते. कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही.
  • NSC खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावे उघडता येते आणि ३ प्रौढांच्या नावावर जॉईंट खाते उघडता येते.
  • १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे पालकही त्यांचे खाते उघडू शकतात.
  • गुंतवणूकीवर आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर वाचवू शकतात.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -