घरअर्थजगतबाजार कोसळला अन् जगातल्या १० श्रीमंत व्यक्तींनी एका दिवसात गमावले २५.१६ ट्रिलियन

बाजार कोसळला अन् जगातल्या १० श्रीमंत व्यक्तींनी एका दिवसात गमावले २५.१६ ट्रिलियन

Subscribe

कोरोनाबाधितांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये बुधवारी ३.५ टक्के इतकी घसरण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये आलेल्या भूकंपामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर परिणाम झाला आहे. जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींनी एकाच दिवसात ३४ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २५.१६ ट्रिलियन रुपयांचं नुकसान झालं आहे.

फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीश यादीद्वारे दररोज सार्वजनिक होल्डिंगच्या चढउतारांबद्दल माहिती मिळते. जेव्हा जगातील विविध भागांमध्ये शेअर बाजार उघडतो, तेव्हा दर पाच मिनिटांत ही अनुक्रमणिका अपडेट केली जाते. परंतु ज्या लोकांची मालमत्ता खासगी कंपनीशी संबंधित आहे, त्यांची संपत्ती दिवसातून एकदाच अपडेट केली जाते.

- Advertisement -

Amazon चे प्रमुख जेफ बेझॉस यांना जवळजवळ ६.७ अब्ज डॉलर्स/ ३.४९ टक्के रुपयांचं नुकसान झालं आहे. फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट अँड फॅमिली यांच्या LVMH या कंपनीचं ४.७ अब्ज डॉलर्स/ ३.९२ टक्के इतकं नुकसान झालं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांचं २ अब्ज डॉलर्स/ १.७८ टक्के इतकं नुकसान झालं आहे. फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचं ५.७ अब्ज डॉलर्स/ ५.४३ टक्के इतकं नुकसान झालं आहे. एलॉन मस्क यांच्या टेस्ला आणि स्पेस एक्स कंपनीचं ३.५ अब्ज डॉलर्स/ ३.७२ टक्के इतकं नुकसान झालं आहे.

मुकेश अंबानी यांना ३१६ कोटी डॉलर/०.४१ टक्के इतकं नुकसान झालं आहे. वॉरेन बफेट यांना २.२ अब्ज डॉलर्स तर लॅरी एलिसन यांना १.९ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. स्टीव्ह बाल्मर आणि लॅरी पेज यांना अनुक्रमे ३ अब्ज आणि ३.५ अब्ज डॉलर्स इतकं नुकसान झालं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -