Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम जोगेश्वरी पोलिसांचा कारनामा, सराईत गुन्हेगाराच्या घरी जात साजरा केला वाढदिवस

जोगेश्वरी पोलिसांचा कारनामा, सराईत गुन्हेगाराच्या घरी जात साजरा केला वाढदिवस

Related Story

- Advertisement -

मुंबई कोरोना काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली. यामुळे मुंबई पोलिसांकडून आता पुन्हा गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. असे असतान मुंबईतील जोगेश्वरी पोलिसांनी चक्क एका सराईत गुन्हेगाराचाचं वाढदिवस साजरा केल्याचा कारनामा समोर आला आहे. जोगेश्वरी पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीतील गुन्हेगाराच्या राहत्या घरी गेल्या आठवड्यात वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे सध्या पोलिसांच्या भूमिकेवर टीका होत आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी एखाद्या सराईत गुन्हेगाराचा अशाप्रकारे वाढदिवस साजरा करणे योग्य आहे का अशा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक कडक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे असताना जोगेश्वरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस महेंद्र नेर्लेकर हे निर्बंध पायदळी तुडवत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नियम मोडल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला जातोय मात्र दुसरीकरे पोलीस अधिकारीच अशाप्रकारे सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करताना स्पष्ट दिसून येत आहेत.

- Advertisement -

संबंधित आरोपीचं नाव दानिश इश्तिखार सय्यद असं आहे. दानिश हा जोगेश्वरी पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीत वास्तव्यास आहे. आरोपी दानिशविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यात सीआर नंबर 165/2018 च्या कमल 307,148, 504 अंतर्गत दानिशवर अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय हातात तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणे, हत्यांऱ्यांचा वापर करत अनेकांना दुखापत पोहचवणे, परिसरातील शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे यासंह अनेक गंभीर गुन्हे जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मात्र सध्या त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी दानिशचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दानिशच्या घरी दाखल झाले होते. त्यांनी दानिशच्या वाढदिवसाचा केप कापत त्याला भरवला. यावेळी कोणत्याही कोरोना नियमांचे पालन होताना दिसले नाही. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.


पोखरणमध्ये सैन्याला भाजीपाला पुरवठा करणारा निघाला ISI दहशतवादी संघटनेचा हेर


- Advertisement -

 

- Advertisement -