घरताज्या घडामोडीCorona: 'हा' चहावाला करतोय कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार

Corona: ‘हा’ चहावाला करतोय कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये इतके भय निर्माण झाले आहे की, काही लोक आपल्या कोरोना संक्रमित नातेवाईकाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार देत आहेत. तर काही लोक हॉस्पिटलमधील रुग्णाचा मृतदेह आणण्यास देखील जात नाही आहेत. पण अशा वाईट परिस्थितीत काही जण मसीहा बनून समोर येत आहेत. अशाच एका मसीहाचे नाव आहे अब्दलु रजाक. तो चहावाला असून त्याचे स्वतःचे दुकान आहे. परंतु या काळात तो लोकांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहे.

काही दिवसांपासून चहावाल रजाकचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यामध्ये तो एका मुलीचा मृतदेह उचलून घेऊन जाताना दिसत आहे. बेंगलुरू मिररच्या वृत्तानुसार, ‘हा फोटो सेंट जॉन्स हॉस्पिटलमधला आहे. यावेळी रजाक या मुलीला अंत्यसंस्कारसाठी नेत होता.’

- Advertisement -

माहितीनुसार, रजाक एका मर्सी अँगल या संस्थेसोबत काम करत आहे. त्या फोटोमधली मुलगी पश्चिम बंगालमधील राहणारी आहे. तिला किडनीचा प्रोब्लेम होता. त्यामुळे तिला सेंट जॉन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिला कोरोनाची लागण झाली होती. ती खूप दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण ती या आजाराला हरवू शकली नाही. त्यानंतर रजाकला त्या वॉलंटिअर ग्रुपमधून फोन आला. त्याला हॉस्पिटलामध्ये बोलावण्यात आले. त्यानंतर तो त्या मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून अंत्यसंस्कारसाठी घेऊन गेले. यादरम्यान त्या मुलीचे पालक देखील सोबत होते.

रजाक कन्नूर येथील राहणार आहे. त्याची फ्रेजर टाउनमध्ये चहाचे दुकान आहे. त्याने सांगितले की, ‘काही महिन्यांपासून लोक या समस्येतून सामोरे जात आहेत. हा काळ खूप कठीण आहे. यादरम्यान त्याला कोणीही कॉल करत आणि तो मग दुकान बंद करून त्यांच्या मदतसाठी धावून जातो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अंघोळी करून पुन्हा कामावर जातो.’ अशा प्रकारे रजाक या कठीण परिस्थितीत काम करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – माय-लेकिचा एकच बॉयफ्रेंड; प्रेमासाठी आईने काढला लेकीचा काटा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -