घरताज्या घडामोडीGST revenue collection: देशातील GST महसूल संकलनात महाराष्ट्राचा १९ हजार ५९२ कोटीचा...

GST revenue collection: देशातील GST महसूल संकलनात महाराष्ट्राचा १९ हजार ५९२ कोटीचा वाटा

Subscribe

करचुकवेगिरी विरोधाताल कारवायांमुळे संकलनात वाढ

डिसेंबर २०२१ मध्ये देशाचे एकूण जीएसटी संकलन १,२९,७८० कोटी रुपये झाले आहे. त्यामध्ये सीजीएसटी २२,५७८ कोटी रुपये, एसजीएसटी २८,६५८ कोटी रुपये, आयजीएसटी ६९,१५५ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ३७,५२७ कोटी रुपयांसह) आणि ९,३८९ कोटी रुपये अधिभाराचा (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या रु. ६१४ कोटींसह) समावेश आहे. सरकारने नियमित तडजोडीचा भाग म्हणून सीजीएसटीपोटी २५,५६८ कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी २१,१०२ कोटी रुपयांची तडजोड केली आहे. डिसेंबर २०२१ साठी केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ४८,१४६ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ४९,७६० कोटी रुपये इतका आहे.

डिसेंबर महिन्यातील जीएसटी संकलनात वाढ

डिसेंबर २०२१ मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा १३% नी जास्त आहे आणि डिसेंबर २०१९ मधील जीएसटी महसुलापेक्षा २६% नी जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल ३६% नी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत ५% नी जास्त आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर, २०२१ च्या तुलनेत (७.४ कोटी) नोव्हेंबर, २०२१ महिन्यात ई-वे बिल्सच्या संख्येत १७% घट होऊनही (६.१ कोटी) महिन्यातील जीएसटी संकलन १.३० लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. सुधारित कर अनुपालन आणि केंद्र आणि राज्य या दोन्ही कर प्राधिकरणांच्या उत्तम कर प्रशासनामुळे हे संकलन झाले आहे.

करचुकवेगिरी विरोधाताल कारवायांमुळे संकलनात वाढ

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत अनुक्रमे १.१० लाख कोटी आणि १.१५ लाख कोटी रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत १.३० लाख कोटी रुपयांचे सरासरी मासिक सकल जीएसटी संकलन झाले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने, करचुकवेगिरी विरोधात केलेल्या कारवाया, विशेषत: बनावट पावत्या देणाऱ्यांविरुद्धची कारवाई यामुळे जीएसटी संकलनात वाढ होत आहे. उलट्या शुल्क संरचनेत सुधारणा करण्यासाठी परिषदेने केलेल्या दर तर्कसंगत करण्याच्या विविध उपायांमुळेही महसुलात सुधारणा झाली आहे. अखेरच्या तिमाहीतही महसुलातील सकारात्मक कल कायम राहील अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

डिसेंबर २०२० च्या तुलनेत डिसेंबर २०२१ मध्ये प्रत्येक राज्यात जमा झालेल्या जीएसटी आकडेवारीमध्ये असे दिसत आहे की, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक १९,५९२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असून डिसेंबर २०२० मधील १७,६९९ कोटी रुपयांच्या तुलनेत ते ११ % नी जास्त आहे. गोवा राज्यात ५९२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असून डिसेंबर २०२० मधील ३४२ कोटी रुपयांच्या तुलनेत ते ७३% नी जास्त आहे.


हेही वाचा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबईच्या किनार्‍यावरील झाडांना पाहून झाले प्रभावित, राष्ट्रपती भवनाने मागवली माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -