घरदेश-विदेशमुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफ होताच तांत्रिक बिघाड

मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफ होताच तांत्रिक बिघाड

Subscribe

भोपाळ – भोपाळहून मुंबईला जाणाऱ्या एअरलाइन इंडिगोच्या फ्लाइटने उड्डाण केल्यानंतर  समस्या निर्माण झाली. विमानात सुमारे 100 प्रवासी होते. विमानातील बिघाडामुळे सर्व प्रवाशांचा श्वास कोंडला होता. तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी विमानाला रनवेवर परतावे लागले, त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, विमानातील बिघाड दुरुस्त होऊ न शकल्याने प्रवासी खाली उतरले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या सकाळच्या मुंबई फ्लाइट क्रमांक 6-E829 ने भोपाळहून मुंबईला सकाळी साडेअकरा वाजता उड्डाण केले. विमानात सुमारे 100 प्रवासी होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान अजूनही धावपट्टीवरच होते, त्यामुळे सुरक्षेसाठी ते परत आणण्यात आले. बिघाड दुरुस्त न झाल्याने प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेतेही विमानात होते.

- Advertisement -

प्रवासी विमानातून उतरल्यानंतर विमानातील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे सांगण्यात येत आहे की इंजिनमधून काही आवाज येत होता, त्यामुळे क्रूने सुरक्षिततेसाठी विमान पुन्हा अप्रेनकडे वळवले. प्रवाशांना काही वेळ थांबण्यास सांगण्यात आले, काही प्रवाशांनी परतावा घेऊन प्रवास रद्द केला तर काही प्रवाशांनी इंडिगोच्या संध्याकाळच्या फ्लाइटने मुंबईला जाण्याचे मान्य केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -