घरताज्या घडामोडीAndhra Pradesh : लग्न समारंभाहून परतलेल्यांवर काळाचा घाला; 9 जणांचा मृत्यू

Andhra Pradesh : लग्न समारंभाहून परतलेल्यांवर काळाचा घाला; 9 जणांचा मृत्यू

Subscribe

आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यात रविवारी 6 फेब्रुवारीला एक भीषण अपघात झाला. अनंतरपूरम जिल्ह्यातील बुडागाव येथे कार आणि लॉरी यांच्यात भीषण टक्कर झाली, त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अनंतपूरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात हा अपघात झाला. मृतांमध्ये सहा महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश असल्याचे समोर येत आहे.

आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यात रविवारी 6 फेब्रुवारीला एक भीषण अपघात झाला. अनंतरपूरम जिल्ह्यातील बुडागाव येथे कार आणि लॉरी यांच्यात भीषण टक्कर झाली, त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अनंतपूरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात हा अपघात झाला. मृतांमध्ये सहा महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. या भीषण अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.अनंतपूर जिल्ह्यातील अपघातातील लोकांच्या मृत्यूची घटना हृदयद्रावक आहे. त्यामुळे शोकग्रस्त कुटुंबांप्रती मोदींनी शोक व्यक्त करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी दोन लाख देण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

अनंतपूरम जिल्ह्यातील बुडागाव येथे झालेल्या भीषण  अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये सहा महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व नातेवाईकच होते. जे रविवारी कर्नाटकातील बेल्लारी येथून त्यांच्या मूळ गावी उर्वकोंडा येथे कारमधून एका लग्नसमारंभातून परत येत होते. त्यावेळेस, समोरून भरधाव वेगाने जाणारी लॉरी अचानक कारमधील लोकांच्या समोर आदळली. टक्कर इतकी जोरदार होती की लॉरी थेट एसयूव्ही कारवर जाऊन आदळली.

- Advertisement -

या अपघाताबाबत माहिती देताना उर्वकोंडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक व्यंकट स्वामी म्हणाले की, या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. उपनिरीक्षक व्यंकट स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये चालकासह एकूण नऊ प्रवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा वेग अतिशय वेगवान होता, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण टक्कर झाली आणि हा अपघात घडला.


हे ही वाचा – CISCE Term 1 Result 2021: ICSE आणि ISC च्या टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा रिझल्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -