घरदेश-विदेशघरफोडीनंतर चोराला फ्रस्ट्रेशन; वैतागून लिहिली मालकाला चिठ्ठी

घरफोडीनंतर चोराला फ्रस्ट्रेशन; वैतागून लिहिली मालकाला चिठ्ठी

Subscribe

चोरांनी मालकाला चिठ्ठी लिहित व्यक्त केली नाराजी.

काही महिन्यांपूर्वी बिहारची राजधानी असणाऱ्या पाटण्यामध्ये एका घरामधील सर्वांना एका खोलीत कोंडून चोरांनी ६० लाखांचा डल्ला मारला होता. त्यावेळी त्या चोरांनी घरातील बेडरुममधील ड्रेसिंग टेबलच्या आरशावर ‘भाभी जी बहुत अच्छी है’, असे लिहिण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच एक घटना ,समोर आली आहे. इंदूरमध्ये एका चोराने घरफोडीनंतर चक्क वैतागून घरमालकाला चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले असून सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे.

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशमधील साहजपूर जिल्ह्यामधील आदर्श नागीन नगरमध्ये एका चोराने रात्रभर जागून घरफोडीचा कट रचला. अथक प्रयत्नानंतर त्या चोराला मालकाच्या घराच्या खिडकीमधून प्रवेश करण्याची संधी मिळाली. घरात प्रवेश केल्यानंतर चोरांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र, चोराला प्रयत्न करुन देखील घर रिकामे असल्याचे दिसले. त्यामुळे या चोराची निराशा झाली. मात्र, निराश झाल्यानंतर त्याने घरातून निघून जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून घरमालकाला आपली नाराजी कळवली.

- Advertisement -

काय होता चिठ्ठीतील मजकूर

घराचे मालक असणारे परवेश सोनी यांच्यासाठी चोराने लिहिलेल्या चिठ्ठीत, असे लिहिलो होते की, ‘घरमालक खूप कंजूस आहेस रे तू. खिडकी तोडण्याची मेहनतही फुकट गेली. संपूर्ण रात्र खराब झाली,’ असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला होता. ही चिठ्ठी घरमालकाचा नोकर सोनी यांना सापडली. चिठ्ठी सापडल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली असता, पोलिसांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरातील कपाट जोर लावून उघडण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच घरभर कपडे पडलेले पोलिसांना अढळले. विशेष म्हणजे सोनी यांच्या डायरीमधील पान फाडून चोराने त्यावर आपली नाराजी व्यक्त करणारा मजकूर लिहिला होता. सोनी हे कामानिमित्त बाहेर असून पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. चोराने लिहिलेली ही चिठ्ठी तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीद्वारे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! पुन्हा एकदा सापडले बॅगेत मृतदेहाचे तुकडे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -