घरदेश-विदेशचीफ ऑफ डिफेन्स स्टाफची घोषणा

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची घोषणा

Subscribe

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे मोदींनी म्हटले. संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बर्‍याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम असेल. सध्या जग वेगाने बदलत आहे. त्यामुळे भारताला तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करता येणार नाही. आपल्या सैन्य दलांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे तिन्ही दलांना वरिष्ठ पातळीवर एक प्रभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या चीफ ऑफ स्टाफ पद अस्तित्वात आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटीत तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असतो. यातील वरिष्ठ सदस्याकडे समितीचे चेअरमनपद दिले जाते. चीफ ऑफ डिफेन्स पद निर्माण केले जावे, अशी मागणी बर्‍याच कालावधीपासून करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी हा मोठा निर्णय घेतला.

- Advertisement -

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ पदाची घोषणा झाली होती. मात्र त्यावेळी वाजपेयींकडे संपूर्ण बहुमत नव्हते. तसेच याबाबत सर्वपक्षीय सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे हे पद स्थापन होऊ शकले नाही. मात्र आता मोदींकडे संपूर्ण बहुमत असल्यामुळे हे पद अस्तित्वात येणार आहे. या पदामुळे पायदळ, नौदल आणि हवाई दलात समन्वय साधता येणार आहे.

१९६२ मध्ये चीनशी भारताचे युद्ध झाले होते. त्यावेळी भारतीय हवाई दलाला कोणतीच भूमिका देण्यात आली नाही. हवाई दल तिबेटच्या पठारावर असलेल्या चीन सैनिकांना लक्ष्य करू शकले असते. तसेच १९६५ च्या पाकिस्तान युद्धाच्यावेळी भारतीय नौदलाला पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हल्ला करण्यास सांगण्यात आले नव्हते. कारगील युद्धात भारतीय हवाई दलाचा उशिराने वापर करण्यात आला. हे सर्व तिन्ही दलांमध्ये नसलेल्या समन्वयामुळे घडले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदामुळे तिन्ही दलांमध्ये समन्वयाची भूमिका योग्यप्रकारे बजावली जाऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -