घरदेश-विदेशAssembly Election 2021: संपूर्ण देशाला नियंत्रित करतेय नागपूरची 'सेना'; राहुल गांधींचा हल्लाबोल

Assembly Election 2021: संपूर्ण देशाला नियंत्रित करतेय नागपूरची ‘सेना’; राहुल गांधींचा हल्लाबोल

Subscribe

आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे २ दिवसाच्या दौर्‍यावर

शुक्रवारी आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे २ दिवसाच्या दौर्‍यावर आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आसामच्या डिब्रूगडमध्ये आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली. या निवडणूक प्रचार मोहीमेदरम्यान दिब्रुगडमधील लोहावळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी मतदारांना संबोधित करताना राहुल गांधींनी बेरोजगारी, सीएए आणि शेतकरी आंदोलन यासारखे मुद्दे उपस्थितीत केले. यासह त्यांनी आरएसएसचे नाव न घेता भारतीय जनता पक्षावर देखील हल्लाबोल केला.

RSS वर राहुल गांधींचा निशाणा

‘लोकशाही नाकारली जात आहे, असे तुम्हाला वाटते, तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलनं, निदर्शनं करत आहेत आणि सीएए लागू केला जात आहे. दिल्लीला गेल्यानंतर आसामच्या लोकांनी आपली संस्कृती आणि भाषा विसरता कामा नये. नागपुरात जन्मलेली एक सेना संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवते. लोकशाही म्हणजे आसामच्या आवाजावर आसामचे नियंत्रण असले पाहिजे. जर आपण यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश केला नाही तर येथे लोकशाही अस्तित्त्वातच नाही. भावी तरुणांनी सक्रियपणे राजकारणात प्रवेश करायला हवा आणि आसामसाठी संघर्ष करावा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे राज्य लुटले जात आहे, तेव्हा तुम्ही युद्ध केले पाहिजे, मात्र हे युद्ध म्हणजे प्रेमळपणे किंवा लाठ्या-काठ्यांसह दगडांनी नव्हे.’

- Advertisement -

…तर CCA लागू होणार नाही

आगामी विधानसभा निवडणुकीत जर आसाममध्ये त्यांच्या पक्षाने सरकार स्थापन झाले तर नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) लागू होणार नाही, असे विधान आसामच्या दिब्रुगडमधील विद्यार्थ्यांशी झालेल्या संभाषणात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. विद्यार्थ्यांशी चर्चेदरम्यान राहुल गांधींनी त्यांना संबोधित केले. ‘लोकांना धर्माच्या नावाखाली भडकावले जाते आणि फूट पाडली जात आहे. यासह तुमच्याकडे जे काही आहे ते सरकार ते तुमच्यापासून हिसकावून घेईल आणि तुमच्या उद्योजक मित्रांना देईल’ असेही राहुल गांधी म्हणाले.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -