बाबा का ढाबाने उघडलं नवं रेस्टॉरंट

कांता प्रसादच्या या नव्या रेस्टॉरंटमध्ये भारतीय आणि चायनिज पदार्थ खाण्यासाठी मिळणार आहेत. त्याचबरोबर कांता प्रसाद त्यांचा जुना बाबा का ढाबाही चालू ठेवणार आहे.

Baba ka Dhaba open a new restaurant
बाबा का ढाबाने उघडलं नवं रेस्टॉरंट

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरून घराघरांत पोहचेल्या बाबा का ढाबा आता नव्या रूपात येत आहे. आज मालवीय नगरमध्ये बाबा का ढाबाच्या नव्या रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले. युट्यूबर गौरव वासन याने काही महिन्यांपूर्वी बाबा का ढाबावर एक व्हिडिओ तयार केला होता. त्यात त्याने बाबा का ढाबाला मदत करण्याते आवाहन केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ग्राहक कमी झाल्याने बाबा का ढाबा डबघाईला आला होता. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओंमुळे बाबा का ढाबाचा चेहरा रातोरात बदलला गेला. बाबा का ढाबाचे आता मोठ्या शानदार रेस्टॉरंटमध्ये रूपांतर झाले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर कांता प्रसाद यांच्या बाबा का ढाबावर लोकांची मोठी गर्दी झाली. त्यांचे आयुष्य सुधारण्यास मोठी मदत झाली. कांता प्रसाद यांनी आपल्या ढाब्याच्या बाजूलाच एक नवे रेस्टॉरंट सुरू केले आहे. कांता प्रसादच्या या नव्या रेस्टॉरंटमध्ये भारतीय आणि चायनिज पदार्थ खाण्यासाठी मिळणार आहेत. त्याचबरोबर कांता प्रसाद त्यांचा जुना बाबा का ढाबाही चालू ठेवणार आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवण तयार करण्यासाठी दोन शेफ ठेवण्यात आले आहेत. तर एक सपोर्टिंग स्टाफही ठेवण्यात आला आहे. कांता प्रसादच्यारेस्टॉरंटमध्ये मटर पनीर ही स्पेशल डिश असणार आहे. यूट्यूबर गौरवला ही कांता प्रसाद यांनी रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे आमंत्रण दिले आहे.

नव्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनानंतर कांता प्रसादच्या पत्नीने आनंद व्यक्त केला आहे. मला खूप आनंद होत आहे. सगळ देवाच्या हातात आहे. जो मीठ भाकरी देऊ शकतो तो सगळ देऊ शकतो, असे कांता प्रसादची पत्नी बादामी यांनी सांगतिले. त्यांच्या मुलानेही या क्षणी आनंद व्यक्त केला. असे दिवस येतील असे आम्हाला कधी वाटले नव्हते, असे तो म्हणाला.

यूट्यूबर गौरव वासन याने बाबा का ढाबावर केलेला व्हिडोओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. गौरवने केलेल्या व्हिडिओमुळे कांता प्रसादच्या अकाउंटमध्ये लाखो रूपयांची मदत झाली. त्यानंतर बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद याने त्याच्या अकाउंटमधील काही पैसे गौरवच्या खात्यात जात असल्याचा आरोप केला होता. परंतु गौरवने हा आरोप खोटा असल्याचे सिद्ध केले.


हेही वाचा – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन