घरदेश-विदेशअ‍ॅलोपॅथी वादानंतर बाबा रामदेव यांनी केले केंद्रीकृत लसीकरण मोहिमेचे कौतुक; म्हणाले...

अ‍ॅलोपॅथी वादानंतर बाबा रामदेव यांनी केले केंद्रीकृत लसीकरण मोहिमेचे कौतुक; म्हणाले…

Subscribe

योगगुरू बाबा रामदेव यांनी केंद्राच्या लसीकरण मोहिमेच्या घोषणेचे कौतुक केले आहे. सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन करीत ते म्हणाले की लवकरच ते देखील कोरोनाची लस घेणार आहे. बुधवारी त्यांनी एक निवेदन जारी केले आणि त्यात असे म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रौढांसाठी कोविड -१९ या लसीकरण मोहीमेसह २१ जूनपासून सरकारी रुग्णालयातील प्रौढांसाठी कोरोनाची लस मोफत देण्यात येईल असे जाहीर केले.

याचे कौतुक करण्याबरोबर ते असेही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून प्रत्येक नागरिकांना मोफत लसीकरणाची ऐतिहासिक घोषणा केली आहे. प्रत्येकाने स्वतःचे लसीकरण केले पाहिजे. तसेच, लोकांनी योग आणि आयुर्वेदाचा अभ्यास केला पाहिजे ज्यामुळे रोगापासून संरक्षणात्मक बचाव होईल.

- Advertisement -

‘आम्हाला कोणत्याही संघटनेशी वैर असू शकत नाही आणि सर्व डॉक्टर या पृथ्वीवर देव पाठविलेले जणू देवदूत आहेत. मनमानी रोखण्यासाठी पंतप्रधान जन औषधी स्टोअर्स सुरू करावे लागलेत, जेणेकरून कमी किंमतीत सामान्यांना औषधे उपलब्ध होतील’, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले तर अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाच्या वादानंतर आपातकालीन घटना आणि शस्त्रक्रिया झाल्यास अ‍ॅलोपॅथी चांगली आहे यात काही शंका नाही परंतु आयुर्वेदही बर्‍याच रोगांवर उपचार करतो, असे त्यांनी सांगितले. काही डॉक्टर केवळ महागडे औषधे लिहून देतात. ब्रांडेड कंपन्यांची औषधे लिहून देणारे डॉक्टर कमिशन खातात असा आरोप स्वामी रामदेव यांनी केला होता. जेनेरिक औषधे देण्याऐवजी ते महागडे औषधे लिहून देतात हा खेळ थांबविण्यासाठी कोर्टात जावं लागलं तरी चालेल असेही ते म्हणाले होते.


Covid-19 नंतर आता भारतात आणखी जीवघेणा व्हायरस! ‘या’ ठिकाणी आढळला पहिला रूग्ण

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -