घरताज्या घडामोडीबांगलादेश मोठ्या आर्थिक संकटात; पेट्रोलचे दर एकाच वेळी 50 टक्क्यांनी वाढले

बांगलादेश मोठ्या आर्थिक संकटात; पेट्रोलचे दर एकाच वेळी 50 टक्क्यांनी वाढले

Subscribe

बांगलदेश महागाईने त्रस्त जनतेला सरकारने आणखी एक मोठा झटका दिला आहे. शनिवारी रात्री बांग्लादेशमध्ये पेट्रोलचे दर 51.7 टक्के आणि डिझेलच्या दरात 42 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. देशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दर वाढ असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महागाईचा फटका सहन करणाऱ्या जनतेला आता दुहेरी फटका सहन करावा लागणार आहे.

रात्री 12 वाजल्यापासून लागू झालेल्या नवीन किंमतीनुसार, एक लिटर ऑक्टेनची किंमत आता 135 रुपये झाली आहे, जी पूर्वीच्या 89 टक्‍के दरापेक्षा 51.7 टक्के अधिक आहे. आता बांगलादेशमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 130 टक्‍के झाली आहे, म्हणजेच काल रात्रीपासून त्यात 44 टक्‍के किंवा 51.1 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

- Advertisement -

पण इंधन दरवाढीमुळे बांगलादेश सरकारवरील अनुदानाचा बोजा कमी होईल. बांगलादेश गेल्या काही वर्षांपासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. सध्या त्याची अर्थव्यवस्था 416 अब्ज डॉलरची आहे. महागाईचा सामना करण्यासाठी बांगलादेशने आयएमएफसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. खरं तर जगभरात वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे बांगलादेशा च्या आयात बिलात वाढ झाली आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे. या दरवाढीनंतर बांगलादेशात एक लिटर पेट्रोलची किंमत आता 130 रुपये (बांगलादेशी चलन) आणि डिझेल 114 रुपये असेल. 1971 मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच किंमती या पातळीवर पोहोचल्या आहेत.

बांगलादेश सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इंधन दरवाढ करणे आवश्यक आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या 6 महिन्यांत सरकारी मालकीच्या तेल कंपनी बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे 8 अब्ज टक्‍के नुकसान झाले आहे. बांगलादेशचे ऊर्जा आणि खनिज संसाधन मंत्री नसरूल अहमद यांनी म्हटले आहे की, नवीन किमती निःसंशयपणे सर्वांनाच असह्य होतील परंतु सरकारकडे पर्याय नाही. जनतेला संयम बाळगावा लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी होताच तेव्हाच देशातही इंधनाच्या किमती कमी होतील.

- Advertisement -

बांगलादेशातील महागाई दर गेल्या 9 महिन्यांपासून सतत 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे. बांगलादेशातील चलनवाढीचा दर जुलैमध्ये 7.48 टक्क्यांवर पोहोचला असून त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांवर झाला आहे. या कुटुंबांच्या जीवनावश्यक दैनंदिन खर्चाचा ताण वाढू लागला आहे.


हेही वाचा : 15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -