15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू असं त्यांनी सांगितलंय

Devendra Fadnavis

मुंबईः 15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तुम्हाला वाटतं त्याहीपेक्षा लवकर होऊ शकतो, असं सांगत कालच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, विस्तार लवकरच होईल. मी त्याही पलिकडे जाऊन सांगतोय की तुम्ही विचार करताय त्याच्याही लवकर होईल, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय. देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

सुप्रीम कोर्टानं मंत्रिमंडळ विस्तार करू नका, असं कुठेही म्हटलेलं नाही. कोर्टाची सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितलं की, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू, असं त्यांनी सांगितलंय.

जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरिता डायलॉगबाजी केली जाते, त्यावेळी असं सांगितलं जाते हे अधिकार फक्त क्वासी ज्युडिशिअल प्रकरणात सुनावणी करण्यासाठी दिले आहेत. याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते. त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक सचिवांना आणि मंत्र्यांना ते अधिकार होते.ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे. क्वासाय ज्युडिशिअल मॅटरच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात. बाकी कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. सरकार जनतेचं आहे, जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्यासोबत कॅबिनेटमध्ये आहे आणि जनतेचे लोकच महाराष्ट्रात निर्णय करतील, असंही फडणवीस म्हणालेत.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील हे सरकार बेकादेशीरपणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवाय, आपणच शिवसेना असून आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी युक्तिवादही झाले. याबाबत 4 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने देखील आपली बाजू मांडली. तर शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत तुम्ही सध्या कुठलाही निर्णय घेऊ नका, असे न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले.


हेही वाचाः पाली, सरडे शोधत तेजस ठाकरे राजकारणात आले, त्यांचे तेवढे कर्तृत्व नाही; निलेश राणेंची जळजळीत टीका