घरदेश-विदेशबेळगाव कर्नाटकची दुसरी राजधानी?

बेळगाव कर्नाटकची दुसरी राजधानी?

Subscribe

बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा सध्या मुख्यमंत्री कुमारस्वामी विचार करत आहेत. २००६ साली मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळेपासून बेळगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले.

बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा विचार सुरू असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी बेळगाववर अन्याय होत असल्याच्या आरोपाचे खंडन केले. बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा आणि काही सरकारी कार्यालये बेळगावला हलवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मांडला आहे. बेळगाव भागातील विकासाला चालना देण्यासाठी बेळगावला दुसऱ्या राज्याचा दर्जा देण्याचा विचार मागील १२ वर्षापासून सुरू आहे. बेळगावचे नामकरण बेळगावी असे करण्यात आले आहे. सध्या बेळगावमध्ये मराठी आणि कानडी असा वाद सुरू आहे. २००६ साली मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळेपासून बेळगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र त्यानंतर आलेल्या सरकारांनी याबद्दल साधा विचार देखील केला नाही. पण आता मी पुन्हा एकदा बेळगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा विचार करत असल्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

काय होईल फायदा?

बेळगावाला दुसऱ्या राजधानीचा दर्जा दिल्यास कलबुर्गी, धारवाड, हुबळी भागातील मोठा फायदा होणार आहे. सरकारी कामासाठी किंवा कोणत्याही लहान-सहान कारणांसाठी कलबुर्गी, धारवाड, हुबळी भागातील लोकांना बेंगळूरला जावे लागते. पण बेळगावला सरकारी कार्यालये सुरू झाल्यास या भागातील लोकांचा त्रास कमी होणार आहे. सध्या कर्नाटकातील १३ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र्य राज्याची मागणी केली जात आहे. त्याच मागणीसाठी गुरूवारी ( उद्या ) बंदचं देखील आवाहन करण्यात आले आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून बेळगावातील मराठी जनतेला महाराष्ट्रामध्ये यायचे आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाद देखील झालेले आहेत. तर मराठी जनतेला कानडी अत्याचाराला देखील सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे बेळगावसह सीमावर्ती भागामध्ये तणावाचे वातावरण देखील पाहायला मिळते.

- Advertisement -

महाजन आयोगाने दिलेल्या अहवालावरून धारवाड, बेळगावसह मराठी बहुल भाग कर्नाटकमध्ये सामील करण्यात आला. त्यावरून अद्याप देखील वाद सुरूच आहे. गेली अनेक दशके हा वाद पेटला आहे. मराठी जनतेला कानडी अत्याचाराचा देखील सामना करावा लागत आहे. दरम्यान, कर्नाटकातील १३ जिल्ह्यांनी केलेली स्वतंत्र्य राज्याची मागणी देखील आता कुमारस्वामी यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देऊन हा वाद शमवण्यासाठी देखील कुमारस्वामी प्रयत्न करताना दिसतील.

 

वाचा – एच. डी. कुमारस्वामींनी नाकारले पंतप्रधान मोदींचे फिटनेस चॅलेज

वाचा – एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -