‘काँग्रेसमध्ये महिलांना ‘आयटम’च मानतात!’

kamal nath controvercial statement on imrati devi calls item

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या पोट निवडणुकांसाठी काँग्रेसच्या एका उमेदवाराचा प्रचार करताना भाजपच्या महिला उमेदवाराला कमलनाथ ‘आयटम’ (Item) असं म्हणाले होते. त्यावरून आता उत्तर भारतातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपकडून काँग्रेसवर परखड टीका केली जात आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी २ तास मूक निषेध आंदोलन देखील केलं. तर कमलनाथ यांनी चक्क ‘आयटम’ हा शब्द संसदेनं दिल्याचा बचाव करण्याचा प्रकार केला आहे. त्यावरून भाजपनं विरोध तीव्र केला असून ‘काँग्रेसमध्ये महिलांना आयटमच मानलं जातं’, अशा खोचक शब्दांमध्ये हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते कमलनाथ?

ये क्या आयटम है! मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांचा प्रचार सुरू होता. याच मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार इमरती देवी (Imarati Devi) निवडणूक लढवत आहेत. यावेळी प्रचाराच्या भाषणात बोलताना कमलनाथ (Kamal Nath) म्हणाले, ‘सुरेश राजेजी आमचे उमेदवार आहेत. सरळ साध्या स्वभावाचे आहेत. हे त्यांच्यासारखे नाहीत. काय आहे त्यांचं नाव? मी तुम्हाला काय त्यांचं नाव सांगू. तुम्ही त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखता. ये क्या आयटम है’.

‘काँग्रेसमध्ये महिलांना आयटम म्हणतात!’

दरम्यान, यावरून टीका करताना अनिल विज म्हणाले, ‘जे मनात असतं ते कधी ना कधी ओठांवर येतंच. कमनलाथ यांनी मध्य प्रदेशमध्ये भाजप महिला मंत्र्यांच्या विरोधात जे अश्लील शब्द वापरले, ते सहज वापरलेले नाहीत. ती काँग्रेसची विचारसरणी आहे. काँग्रेसमध्ये महिलांना आयटमच मानलं जातं’. विज यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आज देशाच्या राजकारणात मध्य प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांची जेव्हा चर्चा होते. तेव्हा एकीकडे दिग्विजय सिंह महिलांना टंच माल म्हटले होते, तर आता कमलनाथ महिला उमेदवाराला आयटम म्हणाले आहेत. गांधी परिवार यावर शांत का आहे हे पाहून मला आश्चर्य वाटतंय’, असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.


वाचा सविस्तर – माजी मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराला म्हणाले आयटम!
हेही वाचा – ‘आयटम’ संसदेने दिलेला शब्द , कमलनाथ यांचा ‘द ग्रेट डिफेन्स’