घरताज्या घडामोडीकाळ्या गव्हाच्या पिकाने शेतकऱ्याचे बदलले नशीब!

काळ्या गव्हाच्या पिकाने शेतकऱ्याचे बदलले नशीब!

Subscribe

सध्या कोरोना व्हायरसमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने लाखो रुपये कमावले आहे. शेतकरी हा पारंपारिक शेतीवर विश्वास ठेवतो. पण मध्य प्रदेशातील या शेतकऱ्याने पारंपारिक शेती ऐवजी एका वेगळ्याच पिकाची शेती केली आहे. या शेतीमुळे या शेतकऱ्याचे नशीब बदलले आहे. त्याला त्याच्या पिकाची चारपट किंमत मिळत आहे. याबाबतची बातमी आज तक या वृत्तसंस्थेने दिली आहे.

धार जिल्ह्यातील सिरसौद येथील हा शेतकरी असून त्याचे नाव विनोद चौहान आहे. विनोदने आपल्या काही एकर जमीनमध्ये काळ्या गव्हाचे पिक लावले होते. जेव्हा कापणी आली तेव्हा विनोदचा आनंद गगनात मावेना. कारण त्याच्याकडे दुर्मिळ काळे गहू खरेदी करण्यासाठी दूरदूरच्या १२ राज्यांतून मागणी होत आहे. सिरसौदाचा हा शेतकरी या दिवसात फक्त उत्साही नाही तर या काळ्या गव्हाच्या पिकाने काहीतरी नवीन करण्यासाठी त्याला प्रेरित केले आहे.

- Advertisement -

विनोद आपल्या काही एकर जमिनीत ५ क्विंटल काळ्या गव्हाची लागवड केली. ज्यामुळे २०० क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन झाले आहे. यामुळे त्याला चारपट फायदा झाला आहे. हे गहू सामान्य गव्हापेक्षा अधिक पौष्टिक असून रोगाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत. या गव्हात लोहाचे प्रमाणही जास्त असते.

यासंदर्भात विनोद चौहान म्हणाला की, जर मी सामान्य गव्हाचे पीक घेतले असते तर त्याची किंमत २५ हजार असती आणि या पिकात २५ हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे लागले. काळ्या गव्हात औषधी गुणधर्म खूप जास्त आहेत. कर्करोग, रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह या रुग्णासांठी हे गहू आरोग्यासाठी खूप चांगले असतात.

- Advertisement -

तसेच पुढे म्हणाल की, सोशल मीडियामुळे या काळ्या गव्हाची जास्त मागणी होत आहे. १२ राज्यातून कॉल आले आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांची काळ्या गव्हाची शेती करण्यासाठी इच्छा आहे. हे गहू ७ ते ८ हजार रुपये क्विंटलने विकत आहे. सामान्य गहू २ हजार रुपये क्विंटल आहे. त्यामुळे सामान्य गव्हाच्या तुलनेत काळ्या गव्हाच्या पिकापासून चारपट अधिक पैस विनोदला मिळत आहेत.


हेही वाचा – Coronavirus: पाकिस्तानमध्ये २४ तासांत आढळले कोरोनाचे ६४०० रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -