घरताज्या घडामोडीCovid booster dose: ज्येष्ठ नागरिकांच्या 'बूस्टर'साठी डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन गरजेचे? केंद्राने दिले स्पष्टीकरण

Covid booster dose: ज्येष्ठ नागरिकांच्या ‘बूस्टर’साठी डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन गरजेचे? केंद्राने दिले स्पष्टीकरण

Subscribe

देशात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याची मोहीम सुरु होत आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू होणार असून बूस्टर डोस १० जानेवारीपासून दिला जाणार आहे. कोरोना योद्धांना आणि हृदयविकासारख्या गंभीर आजारग्रस्त ६० वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. पण बूस्टर डोससाठी डॉक्टरचे प्रिसक्रीप्शन गरजेचे आहे की नाही? याबाबतचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. देशातील गंभीर आजारग्रस्त ६० वर्षांवरील लोकांना कोरोना लसीचे प्रिकॉशन डोस (बूस्टर डोस) घेण्यासाठी डॉक्टराच्या प्रिसक्रीप्शनची गरज नसल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. अशा लोकांनी बूस्टर डोस आणि तिसरा डोस घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा डॉक्टरांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पत्रात लिहिले आहे की, निवडणूक असणाऱ्या राज्यांमधील निवडणुकीच्या कामासाठी तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीत सामिल केले जाईल. दुसऱ्या डोसच्या तारखेवर बूस्टर डोस देणे अवलंबून असेल.

- Advertisement -

पुढे राजेश भूषण यांनी सांगितले की, दुसऱ्या डोस घेतल्याच्या तारखेनंतर नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस दिला जाईल. बूस्टर डोस घेणाऱ्या लोकांना एसमएस पाठवला जाईल.


हेही वाचा – Booster Dose India: बूस्टर डोससाठी तुमचा नंबर केव्हा येणार? सरकार पाठवणार SMS अलर्ट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -