घरताज्या घडामोडीमहेंद्रसिंग धोनीविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

महेंद्रसिंग धोनीविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Indian former cricketer Mahendra Singh Dhoni) याच्या विरोधात केस करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) 8 जणांविरोधात बेगूसरायच्या कोर्टात (Begusarai court) केस करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Indian former cricketer Mahendra Singh Dhoni) याच्या विरोधात केस करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) 8 जणांविरोधात बेगूसरायच्या कोर्टात (Begusarai court) केस करण्यात आली आहे. बेगूसरायमधल्या एसके इंटरप्राईजेजचे प्रोप्रायटर नीरज कुमार यांनी ही केस दाखल केल्याचे समजते.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

धोनी विरोधात हे प्रकरण कृषी खत उत्पादक कंपनीशी संबंधित आहे. एसके इंटरप्राईजेजचे (SK Enterprises) प्रोप्रायटर नीरज कुमार निराला यांच्या माहितीनुसार, न्यू उपज वर्धक इंडिया लिमिटेडने 30 लाख रुपयांपेक्षा जास्तचा उत्पाद करार त्यांच्या एजन्सीसोबत केला होता. त्यानंतर याची डिलिव्हरही करण्यात आली. मात्र, उत्पादनाच्या विक्रीच्या क्रमात कंपनीने आपल्याला सहकार्य केले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खत शिल्लक राहिले, असा आरोप नीरज कुमार यांनी केला.

हेही वाचा – महेंद्र सिंग धोनीची नवी इनिंग; चित्रपट बनवणार, अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत

- Advertisement -

30 लाख रुपयांचा चेक

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने उरलेले खत परत घेतले आणि त्याऐवजी 30 लाख रुपयांचा चेकही आपल्याला दिला. तसेच, हा चेक आपण बँकेत टाकला पण तो बाऊन्स झाला, याची कायदेशीर नोटीस कंपनीला देण्यात आली, असे नीरज कुमार यांनी म्हटले.

हेही वाचा – सामन्यादरम्यान धोनीने बॅट चावण्याचा अमित मिश्राने केला खुलासा; वाचा नेमक काय म्हणाला…

अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात केस दाखल

परंतु, नोटीस दिल्यानंतरही कंपनीने कोणंतही उत्तर दिले नाही, तेव्हा नीरज कुमार यांनी कंपनीचे सीईओ राजेश आर्य यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात केस दाखल केली. या खताची टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने जाहिरात केली होती. त्यामुळे नीरज कुमारने धोनीविरोधातही खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी 28 जून रोजी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीवेळी न्यायालय धोनीला दिलासा देते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Delhi Heavy Rain: दिल्लीत मुसळधार पावसामुळे दोन जणांचा मृत्यू; जनजीवनही विस्कळीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -