Monsoon Update : राज्यात मान्सून ६ जूनला धडकणार, येत्या २४ तासांत मराठवाड्यात पावसाची शक्यता

केरळात पावसाने (Monsoon in Kerala) हजेरी लावल्यानंतर आता राज्यात मान्सून ६ जूनला (Monsoon Update) धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या ६ जून ते १० जूनच्या दरम्यान राज्यात मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. आज देखील राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत विदर्भासह मराठवाड्यात पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह येत्या २४ तासांत मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर येत्या २ जून ते ३ जून रोजी कोकण आणि गोव्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मान्सूनने अरबी समुद्राचा मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे.

दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून केरळचा उर्वरीत भाग, दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू आणि कर्नाटकचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत गोव्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण हवामानात अचानक बदल झाल्यानंतर अनेक ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस झाला. वादळ इतकं जोरदार होते की अनेक ठिकाणी झाडं आणि रस्त्याचे खांब तुटले.

स्कायमेट विरूद्ध हवामान विभाग

मान्सूनच्या आगमनावरून हवामान विभाग आणि स्कायमेट आमनेसामने आले आहेत. केरळात दाखल झालेला पाऊस हा पूर्व मोसमी असल्याचा दावा हा स्कायमेटकडून करण्यात आला आहे. जे एकूण निकष आहेत. वादळी वाऱ्यासह ६० टक्क्यांवर पावसाचं आगमन केरळात होणं आवश्यक आहे. तसेच २.५ मिमी पाऊस इतका असणं आवश्यक आहे. स्कायमेट वर्तवलेल्या अंदाजानुसार २६ मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तर २७ मे रोजी हवामान विभागाकडून पावसाच्या अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, त्या दिवशी मान्सून न झाल्यामुळे स्कायमेटने हवामान विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.


हेही वाचा : कोकणात पाऊस भरवतोय धडकी!