घरदेश-विदेशअजबच! रावणाच्या 10 मुंडक्यांचा पालिका कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप

अजबच! रावणाच्या 10 मुंडक्यांचा पालिका कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप

Subscribe

छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात बुधवारी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याची मुंडकी न जळल्याने पालिकेच्या लिपिकला निलंबित करण्यात आले तर चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, धमतरी जिल्ह्यात दसऱ्याचा उत्साह साजरा होत होता. यावेळी रावणाचा पुतळा तयार करत तो जळण्याची प्रथा आहे.  करताना दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे धमतरी महानगरपालिकेच्या सहाय्यक ग्रेड तीन राजेंद्र यादव या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

धमतरी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून जारी केलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, धमतरी पालिकेच्या वतीने दसरा महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी रावणाचा पुतळा तयार करण्यात सहाय्यक ग्रेड तीन नगर पालिकेचे राजेंद्र यादव त्यांनी मोठा निष्काळजीपणा दाखवला आहे. ज्यामुळे पालिकेच्या प्रतिमा मलीन झाली आहे. याप्रकरणी कर्मचारी यादव यांनी निलंबित करण्यात आले आहे. मात्र निलंबन काळात नियमानुसार ते निर्वाह भत्त्यासाठी पात्र असतील. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर्मचारी यादव यांच्यासह सहाय्यक अभियंता विजय मेहरा आणि उप अभियंता लोमस देवांगन, कमलेश ठाकूर आणि कामता नागेंद्र यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, धमतरी शहरात दसरा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या सणानिमित्त पालिकेच्यावतीने रावणाचा मोठा पुतळा तयार केला जातो. हा पुतळा दहन करण्यासाठी मोठा मैदानात बसवण्यात आला होता. यावेळी मोठी काठी आणि फाटले कपडे पाहून लोक पुतळ्याची खिल्ली उडवू लागले. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दसऱ्या सणादिवशी संध्याकाळी जेव्हा पुतळा जाळण्यात आला. तेव्हा या पुतळ्याचे मुंडक सोडून इतर सर्व गोष्टी चार मिनिटात जळून खाक झालं. मात्र संपूर्ण दहाही मुंडकी जळलीच नाही. यामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे.


दीक्षाभूमीवरील गर्दीला लोकशाही आणि मानवतावादाची चिंता!

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -