तरुणांनो नोकरीच्या शोधात आहात? प्रतिक्षा संपली! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

coal India recruitment 2020 for 1326 management trainee posts
नोकरीची सुवर्णसंधी

सरकारी खनिज कंपनी कोल इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी १३२६ जागांची भरती निघाली आहे. कंपनीला या पदासाठी हुशार आणि उत्साही नवखे इंजिनिअर हवे आहेत. याशिवाय आणखी काही इतर पदांसाठी ही भरती निघाली आहे. या नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. येत्या २१ डिसेंबर पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. २१ डिसेंबर २०१९ ते १९ जानेवारी २०२० या कालावधीत अर्जदार अर्ज दाखल करु शकणार आहेत. २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० रोजी या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे.

पदासाठी काय पात्रता हवी?

अर्जदाराचे जर BE/B.Tech/B.Sc (Engg.)/MCA,CA/ICWA, MBA झाले असले तर त्यांना निदान ६० टक्के तरी असावेत. याशिवाय मानव संसाधन/औद्योगिक संबंध/कार्मिक व्यवस्थापन PG डिप्लोमा,MHROD,MSW या शाखांमध्येही शिक्षण झालेल्यांना निदान ६० टक्के अपेक्षित आहे. फक्त SC/ST/PWD मध्ये मोडणाऱ्या अर्जदारांना ५५ टक्के अपेक्षित आहेत.

वयाची अट : अर्जदाराचे वय १ एप्रिल २०२० रोजी ते १८ ते ३० वर्षे या वयोगटाच्या आत असावे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाची फी: OPEN/obc/ews : १००० रुपये/- याशिवाय SC/ST/PWD मध्ये मोडणाऱ्या अर्जदाकरांसाठी फी नाही.

शाखा आणि पदसंख्या :

१. मायनिंग – २८८ जागा
२. इलेक्ट्रिकल – २१८ जागा
३. मेकॅनिकल – २५८ जागा
४. सिव्हिल – ६८
५. कोल प्रिपरेशन – २८
६. सिस्टम – ४६
७. मटेरियल मॅनेजमेंट – २८
८. फायनांस / अकाउंट्स – २५४
९. पर्सोनल / HR – ८९
१०. मार्केटिंग आणि सेल्स – २३
११. कम्युनिटी डेव्हलोपमेंट – २६
एकूण – १३२६


हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात 2 लाख 60 हजार बेरोजगार नोकरीच्या प्रतिक्षेत