कर्नल गीता राणा यांनी रचला इतिहास, ‘हे’ यश मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या

ही जबाबदारी मिळाल्याने गीता राणा यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.

Colonel-Geeta-Rana

आज देशातील मुली प्रत्येक क्षेत्रात भारताचं नाव रोशन करत आहेत. यासोबतच भारतीय लष्करातील मुलीही अतिशय चांगल्या पद्धतीने देशाचे रक्षण करत आहेत. अशाच एक कर्नल गीता राणा यांनी इतिहास रचला आहे. कर्नल गीता राणा यांच्या नावावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

लष्कराने अलीकडेच कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्स, ऑर्डनन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनीअर्स आणि इतर शाखांमध्ये स्वतंत्र युनिट्सचे नेतृत्व करण्यासाठी महिला लष्करी अधिकाऱ्यांसाठी १०८ रिक्त जागा भरल्या आहेत. आगामी काळात इतर महिला लष्करी अधिकाऱ्यांनाही अशा नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात. ज्या महिला अधिकाऱ्यांना मंडळांकडून मान्यता मिळू शकेल, त्यांनाही कमांड रोल देता येईल आणि भविष्यात त्यांना उच्च पदांवर नियुक्ती दिली जाऊ शकते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नल गीता राणा या पूर्व लडाखच्या फॉरवर्ड आणि दुर्गम भागात फील्ड वर्कशॉपचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. गीता राणा सध्या कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्समध्ये कर्नल आहेत.

भारतीय लष्कर मित्र देशांसोबतच्या लष्करी सरावांमध्ये महिला सैनिकांनाही सहभागी करून घेत आहे. यासोबतच महिला लष्करी अधिकाऱ्यांनाही शांती मिशनसाठी पाठवले जात आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे लष्करात महिला अधिकाऱ्यांना सर्व शक्य असेल त्या संधी देत असतात. लवकरच लष्करातील आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिला लष्करी जवानांचीही नियुक्ती होऊ शकते. ही जबाबदारी मिळाल्याने गीता राणा यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.