घरताज्या घडामोडीUP Assembly Election 2022: 'लड़की हूं'ची कॅम्पेन गर्ल भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

UP Assembly Election 2022: ‘लड़की हूं’ची कॅम्पेन गर्ल भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आले आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून उमदेवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. परंतु काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसची ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ या अभियानाची पोस्टर गर्ल निवडणुकीपुर्वी भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा जोरदार रंगत आहे. काँग्रेसकडून ‘लड़की हूं’च्या कॅम्पेन गर्लला विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे प्रियंका मौर्य भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मी एक योग्य उमेदवार.., पण तिकीट कापलं

एका वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मी क्षेत्रात खूप काम केलं आहे. तसेच तिकीट वितरणाबाबतीत पूर्वनियोजन करण्यात आलं होतं. परंतु मी एक योग्य उमेदवार असून सुद्धा मला तिकीट दिलं गेलं नाहीये, असं पोस्टर गर्ल प्रियंका मौर्य म्हणाल्या. यासाठी त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. लड़की हूं, लड़ सकती हूं, एक स्लोगन आहे. तरिसुद्धा काँग्रेसने मला लढण्याची संधी दिली नाही, असं मौर्य म्हणाल्या. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी या मोहिमेसाठी त्यांना पोस्टर गर्ल बनवले होते.

- Advertisement -

पोस्टर गर्ल भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

प्रियंका मौर्य या उत्तर प्रदेशातील महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा आहेत. यावर त्या लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत. काँग्रेस विधानसभा निवडणुकीपूर्वी लड़की हूं, लड़ सकती हूं या मोहिमेचा भाग म्हणून राज्यभरात मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहिम स्थगित करण्यात आली. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहेत. तसेच १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.


हेही वाचा : Maharashtra School Reopen : राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -