‘ती’ पगडी घालण्यावरूनही भाजपाची राहुल गांधींवर टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली 'भारत जोडो यात्रा' सध्या पंजाबमधून जात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पगडी घातल्याचे दिसून आले. मात्र, आता राहुल गांधींच्या या पगडी घालण्यावरूनही नव्या वादाला वाचा फुटली आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या पंजाबमधून जात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पगडी घातल्याचे दिसून आले. मात्र, आता राहुल गांधींच्या या पगडी घालण्यावरूनही नव्या वादाला वाचा फुटली आहे. राहुल गांधींच्या पगडी घालण्यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधी जे काही करतात ते केवळ दिखावा आहे आणि सर्व स्क्रिप्टेड आहे”, असा टोला भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी लगावला. (Congress MP Rahul Gandhi Refused To Tie Turban Without Camera Claim Bjp Amit Malviya Tweet Watch Video Bharat Jodo Yatra)

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. अमित मालवीय यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “भारत जोडो यात्रेत पगडी बांधण्यासाठी कोणाला आमंत्रित करावे आणि त्याचा रंग यासह सर्व काही कोरिओग्राफ केलेले आहे. मात्र आक्षेपार्ह मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी कॅमेरे नव्हते म्हणून पगडी घालण्यास नकार दिला होता. राजकारणासाठी धार्मिक भावनांचे शोषण करणे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे”.

अमित मालवीय यांनी तीस सेकंदाचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी पगडी विषयी काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. दरम्यान, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्याला कॅप्शन दिले की, “अभी नहीं बंधुंगा” राहुल गांधी यांनी कॅमेरा आणि मीडियाचे लोक नसताना डोक्यावर पगडी बांधण्यास नकार दिला. टिशर्ट पासून “दस्तर” पर्यंत भारत जोडो यात्रेतील प्रत्येक कृती हा नौटंकी आणि लिखित स्क्रिप्टचा भाग आहे. गांधी कुटुंबाचा शीखविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, राहुल गांधी पगडीच्या आधी टी-शर्ट घालण्यावरून वादात सापडले आहेत. राहुल गांधींचा टी शर्ट घातलेल्या फोटो शेअर करून भाजपने म्हटले होते की, राहुल गांधी टी-शर्टच्या आत इनर घालतात आणि फक्त नाटक करतात.याप्रकरणाची देखील बरीच चर्चा झाली होती.


हेही वाचा – ‘बीडीडी चाळ’ प्रकल्पात नियमबाह्य काही नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा