घरदेश-विदेशLive Update : लतादीदींच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संदेश पाठवला

Live Update : लतादीदींच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संदेश पाठवला

Subscribe

लतादीदींच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संदेश पाठवला

लतादीदींच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश पाठवला असल्याचे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल म्हणाले. पीयुष गोयल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

- Advertisement -

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, उपचारांना प्रतिसाद देत असल्याची आशा भोसलेंची माहिती


लतादीदींना ईश्वराने दीर्घायुष्य द्यावे – भाजप नेते देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळेंकडून लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस

लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचापूस रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी  खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


Maharashtra Corona Update: राज्यात ११,३९४ कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात ११ हजार ३९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ६८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


Mumbai Corona Update : मुंबईत २४ तासात ६४६ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासात ६४६ कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या २४ तासात मुंबईत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्या मोठी आहे.

५ फेब्रुवारी, संध्या. ६:०० वाजता

२४ तासात बाधित रुग्ण-६४३

२४ तासात बरे झालेले रुग्ण-१४०२

बरे झालेले एकूण रुग्ण-१०२४९९१
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%

एकूण सक्रिय रुग्ण-६३६७

दुप्पटीचा दर-६६६ दिवस
कोविड वाढीचा दर (२९जानेवारी- ४ फेब्रुवारी)-०.१०%


हिंदुस्थानी भाऊला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी परिसरात, रामानुज सहस्त्राब्दी पुतळ्याचे अनावरण


पुण्यात शिवसैनिकांनी माजी खासदार किरीट सोमय्यांची गाडी अडवली

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची गाडी पुण्यातील शिवसैनिकांनी अडवली आहे. कोविड सेंटरची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात जात होते. यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.


पुणे महापालिकेच्या आवारात शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केला – सोमय्या

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची पुण्यातील शिवसैनिकांनी गाडी अडवली आहे. यानंतर सोमय्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला असल्याचे किरीट सोमय्यांनी ट्विट करुन सांगितले आहे.


आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना संतोष परब हल्ला प्रकरणात १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु नितेश राणेंची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना कोल्हापूरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


लतादीदी आयसीयुत असून त्या उपचाराला प्रतिसाद देताहेत – डॉक्टर

लतादीदी आता रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लतादीदी उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यावर आयसीयुमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. (सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा)


लतादीदींच्या विचारपूस करुन राज ठाकरे रुग्णालयातून निघाले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णलायात गेले होते. रुग्णालयात लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर राज ठाकरे आता निघाले आहेत.


आमदार नितेश राणेंच्या जमीनाची मागणी वकील सतीश मानेशिंदे यांनी केली आहे.


लतादीदींची प्रकृती खालावली, राज ठाकरे ब्रीच कँडीत दाखल

लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ, प्रतित समदानी यांनी दिली आहे.


गायिका लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल


गायिका लता मंगेशकर यांची तब्येत बिघडली, पुन्हा व्हेंटिलेटरवर


खासदार उदयनराजे भोसले अजित पवारांच्या भेटीला


संपूर्ण देशाचं उत्तर प्रदेश निवडणुकीकडे लक्षं- संजय राऊत


मंत्री आदित्य ठाकरे यांनी वांद्र्यातील स्वच्छता मोहिमेचा घेतला आढावा


भाजपच्या निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार ऍड आशिष शेलार यांची निवड


पुण्यात आता पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ भरणार : अजित पवार


दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के


राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची सकाळी 11 वाजता मुंबईत महत्त्वाची बैठक

हजारो एसटी कर्मचारी मुंबईत दाखल, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय होण्याची शक्यता


देशात आज 1 लाख 27 हजार 952 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राष्ट्रपती रामनाथ कोविंद 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

11 ते 13 फेब्रुवारीदरम्यान करणार महाराष्ट्र दौरा


हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज निकाल लागण्याची शक्यता


राज्य मागास आयोगाची आज पुण्यात बैठक

सर्वोच्च न्यायालयाच्या 8 फेब्रुवारीच्या आधी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा


आमदार नितेश राणे यांना 14 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -