घरदेश-विदेशLive Update : CBSE बोर्डाच्या पहिल्या सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर

Live Update : CBSE बोर्डाच्या पहिल्या सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर

Subscribe

राज्यात नव्या १ हजार ४८५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून मागील २४ तासत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ७८ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून राज्यात सध्या २८ हजार ८ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

- Advertisement -

मुंबईत २४ तासात ३७३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ५४३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याचप्रमाणे मागील २४ तासात मुंबईत ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईत सध्या ४ हजार ८५३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

CBSE बोर्डाच्या पहिल्या सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२१-२२च्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा आणि परीक्षांचे टाइम टेबल जाहीर करण्यात आले आहे.


कल्याण शीळ रोडवर पोलीस व्हॅनला भीषण आग लागली आहे. ही व्हॅन मुंबई रेल्वे पोलिसांची असल्याची माहिती समोर येत आहे. कटई नाक्याजवळ या पोलीस व्हॅनला आग लागली. आगीत गाडी जळून खाक झाली असून यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.


पुणे पोलिसांकडून किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक, कोर्टात करणार हजर, शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव असून तिने तरुणाला नोकरी देण्याचे अमिष दाखवून त्याची फसवणूक केली होती.


कलम ३७० हटवण्यावर संजय राऊतांचे वक्तव्य दुटप्पी. सामनाच्या अग्रलेखातून अत्यंत खालच्या पातळीवर टीका होतेय, अमली पदार्थ्यांच्या समर्थनार्थ कोण उभं राहतं हे कळतं- प्रविण दरेकर


शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक संपली, विविध क्षेत्रांतील संघटनांचे अध्यक्ष बैठकीला होते उपस्थित,


शिवसेना खासदार भावना गवळी यांनी २० ऑक्टोबरला ईडीकडून चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स, भावना गवळी यांनी ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवला आहे.


गुरु माँ कांचन गिरी राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल,


जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही स्थिती हाताबाहेर, मोहन भागवतांनी ज्वलंत सत्य मांडलं, पाकबाबत धमक्यांची भाषा वापरुन थांबता येणार नाही- संजय राऊत


सुरतमधील कडोदरतील एका पॅकेजिंग फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याची घटना, दोन मजुरांचा मृत्यू तर १२५ जणांना सुखरुप वाचवण्यात यश


जनता सब जानती है, ईडी, सीबीआयच्या कारवाईवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील कोव्हिड-१९ टास्क फोर्सची बैठक, दुपारी ३ वाजता होणार बैठक, कोरोना निर्बंध आणि त्यातील शिथिलतेवर चर्चा होण्य़ाची शक्यता


आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात होणार महत्त्वपूर्ण बैठक, सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी १२.३० वाजता होणार बैठक, राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू अनेक जखमी, सहा गाड्यांची एकमेकांना धडक झाल्याने झाला अपघात, खोपोलीतील बोरघाटात झाला अपघात (सविस्तर) 


केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. केरळमध्ये सतत कोसळणार मुसळधार पावसामुळे आत्तापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -