घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: चिंपांजीमधील एडिनोविषाणू कोरोनाला हरवणार

Coronavirus: चिंपांजीमधील एडिनोविषाणू कोरोनाला हरवणार

Subscribe

कोविड-१९ वरील प्रभावी लसीबद्धल निश्चिन्त रहा. ही लस ८० टक्के यशस्वी ठरणार याची हमी आम्ही देतो, असं ऑक्सफोर्डच्या जेनर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी म्हटलं आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता लवकरच थांबवता येणार आहे. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी चिंपांजी वानरांतील एडिनोविषाणूमध्ये थोडा बदल करून बनवलेल्या लसींचा वानरांवर प्रयोग केला होता. शास्त्रज्ञांचा हो प्रयोग यशस्वी झाला आहे. कोविड-१९ वरील प्रभावी लसीबद्धल निश्चिन्त रहा. ही लस ८० टक्के यशस्वी ठरणार याची हमी आम्ही देतो, असं ऑक्सफोर्डच्या जेनर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी म्हटलं आहे. दरम्यान, या लसीची चाचणी माणसांवर केली तर, याचे दुष्परिणाम होतील का? याचा अभ्यास आता संशोधक करत आहेत. शिवाय, या लसीचे सप्टेंबरपर्यंत १० लाख डोस बनवले जातील, असा दावाही ऑक्सफोर्डच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.

ऑक्सफोर्डची एडिनोव्हायरस लस कोरोनाच्या रुग्णांवर ८० टक्के प्रभावी ठरेल, असा दावा लस संशोधनाच्या प्रमुख साराह गिल्बर्ट यांनी केला आहे. चिंपांजींवर केलेल्या चाचण्यांच्या अभ्यासानुसार या वानरांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली. या लसीमुळे त्यांच्यात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीची हार्ड इम्युनिटी तयार झाली. मात्र, या लसीचा माणसांवर काही दुष्परिणाम होतोय की नाही ते आम्हाला बघायचं आहे. तथापि, आम्ही या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करु, असं गिल्बर्ट यांनी म्हटलं. याबाबतची माहिती न्यूयॉर्क टाईम्सने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: जाणून घ्या लस तयार करण्याची प्रक्रिया


चिंपांजी वानरांमधील एडिनोविषाणू (ChAdOx1) या सर्दीच्या विषाणूच्या जिनेटिक रचनेत काहीसे बदल करून ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी नवा विषाणू तयार केला. त्यात कोरोना विषाणूचे काही जिन्स (गुणसूत्रे) वापरण्यात आले आहेत. या एडिनोविषाणूची लस माणसाला टोचली की त्यातील विषाणू मानवी पेशींत शिरून विशिष्ट प्रकारचे प्रोटीन तयार करतील. हे प्रोटीन इम्युनिटी वाढवेल आणि कोरोनाच्या पेशींना संपवेल. नवी लस मानवी पेशींमध्ये कोरोनाला संपवणाऱ्या अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करणार आहे. भविष्यात ही लस प्रभावी ठरल्यास जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणंही शक्य होईल, असा विश्वास संशोधकांना आहे.

- Advertisement -

दरम्यान, आता चिंपांजीवरील यशस्वी चाचण्यांनंतर मानवांवर या लसीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. ५०० जणांना या नव्या लसीचे डोस देण्यात आले असून त्यांच्यावर या लसीचे काही दुष्परिणाम होतात की नाही हे पाहून पुढे ५ हजार जणांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. यासाठी ब्रिटीश सरकारने संस्थेला १८० कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरु केलं जाणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -