घरCORONA UPDATEधक्कादायक! उत्तर प्रदेशात एक्सपायरी किटमधून करण्यात आल्या १० हजार चाचण्या, अनेकांचे रिपोर्ट...

धक्कादायक! उत्तर प्रदेशात एक्सपायरी किटमधून करण्यात आल्या १० हजार चाचण्या, अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Subscribe

देशात कोरोनाचा दुसऱ्या लाटेने कहर केला असून मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु यातही दिलासजनक बाब म्हणजे देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसतेय. मात्र अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्सची संख्या संख्या अपुरी पडत आहे. यादरम्यान अनेक राज्यात औषधे, इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांची चढ्या भावाने विक्री, काळाबाजार किंवा अनेक रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार सुरु आहे. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधून उघडकीस आला आहे. उत्तप्रदेशच्या बरेली येथे आरोग्य विभागाकडून तारीख उलटून गेलेल्या म्हणजेच एक्सपायर अँटिजेन किटने तब्बल १० हजार नागरिकांचा कोरोना चाचण्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या १० हजार एक्सपायर अँटिजन किटने केलेल्या १० हजार कोरोना चाचण्यांपैकी बहुतांश रिपोर्ट हे निगेटिव्ह असल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकारानंतर आरोग्य व्यवस्थेने अनेकांचा शोध घेत त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. परंतु या एक्सपायर किटने चाचणी केलेल्या सर्व नागरिकांचा शोध घेणे आता आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यातील अनेकांचा शोध घेणे सुरु आहे. मात्र या घटनेवर आरोग्य विभागातील अधिकारी एक शब्दही काढण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

उत्तरप्रदेशात काही ठिकाणी एक्सपायरी अँटीजन टेस्ट किटचा वापर होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. यावर मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर देण्याची सूचना केल्या आहेत, मात्र एक्सपायरी अँटिजन किटचा वापर करायचा की नाही, यासंदर्भात कोणतेच निर्देश दिले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या एक्सपायरी अँटीजन किटच्या माध्यमातून केलेल्या हजारो जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आलेय मात्र यातलही बहुतांष जणांना कोरोनाची लागण झालेली असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहेत. हजारो नागरिकांचा चाचण्या या एक्सपायरी अँटिजन किटमधून केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील एकूण संख्येत १८ ते २० टक्के घट झाल्याचे सांगितले जात आहे.


लसीकरण डायलर ट्यूनसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले


 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -