देशातील कोरोनाबाधित ९० लाख पार, ९३ टक्के कोरोनामुक्त!

coronavirus cases cross 90 lakh more then 93 percent people cured in india
देशातील कोरोनाबाधित ९० लाख पार, ९३ टक्के कोरोनामुक्त!

भारतातील कोरोनाची स्थितीत सुधारणा होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४५ हजार ८८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९० लाख पार झाली आहे. तसेच २४ तासांत ४४ हजार ८०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ८४ लाख २८ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील रिकव्हरी रेट ९३.६० टक्क्यांवर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, काल (गुरुवार) दिवसभरात ५८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत देशातील १ लाख ३२ हजार १६२ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे देशातील सध्याचा मृत्यूदर १.४७ टक्के झाला आहे. दरम्यान सध्या देशात ४ लाख ४३ हजार ७९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गुजरात सरकारने अहमदाबादमध्ये रात्री कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू शुक्रवारी रात्रीपासून लावला जाईल. सध्या दिल्लीत देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात ५ हजार ५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ लाख ६३ हजाक ५५ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ७९ हजार ७३८ Active रुग्ण आहेत. राज्यात १५४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४६ हजार ३५६वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.


हेही वाचा – सर्वसामान्यांना ‘एवढ्या’ रुपयांत मिळणार ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस