घरताज्या घडामोडीCoronavirus: कोरोना लढाईत चीनी लोकांसाठी गाईचे दूधच ठरले अस्त्र!

Coronavirus: कोरोना लढाईत चीनी लोकांसाठी गाईचे दूधच ठरले अस्त्र!

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी, तिसरी लाट आली आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहेत. पण काही देशांनी कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. यापैकी एक देश म्हणजे चीन. ज्या देशातून कोरोना पसरला त्या चीनमध्ये आता कोरोना आटोक्यात आला आहे. सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला जागतिक क्रमवारीत चीन पहिल्या स्थानावर होता. मात्र आता चीन जागतिक क्रमवारीत ९६व्या स्थानावर आहे. चीनमध्ये कोरोना आटोक्यात येण्याचे कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल. चीनमधील लोकं कोरोनाला हरवण्यासाठी गायीच्या दुधाचा वापर करत आहेत.

चीनी सरकारने लोकांना शरीरात प्रोट्रीनचे प्रमाण वाढवण्यासाठी जास्तीत जास्त दूध पिण्यासाठी सांगत आहेत. प्रोट्रीन इम्यून सिस्टमला (प्रतिकारशक्ती) मजबूत करते, असा दावा केला जात आहे. गेल्या वर्षी कोरोना उद्रेक झाल्यानंतर संसदेच्या वार्षिक बैठकीत तेथील विधिमंडळांनी सरकारला दूध पिण्याबाबत एक कायदा करण्याची सूचना दिली होती. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला दररोज कमीत कमी ३०० ग्रॅम दूध पिण्याचा सल्ला दिला गेला होता.

- Advertisement -

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, शांघाई केहुआशान रुग्णालयामधील संसर्गजन्य रोग विभागाचे प्रसिद्ध डॉक्टर झांग वेगहोंग यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात चीनच्या पालकांना विशेष सल्ला दिला होता. डॉक्टर वेगहोंगने सांगितले की, ‘आई-वडिलांनी दरदिवशी सकाळी मुलांना दूध आणि अंडी देण्यास सुरुवात केली पाहिजे. ब्रेकफास्टमध्ये पोर्रिज देना बिल्कुल बंद केले पाहिजे.’ पण चीनच्या काही सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर दूध पिण्याबाबत वाद झाला. चीनमध्ये जास्तीजास्त लोकं ब्रेकफास्टमध्ये बन आणि पोर्रिज खातात. लोकांचे म्हणणे आहे की, आपला पारंपारिक नाश्ता सोडून दूध आणि टोस्ट कितीपत योग्य आहे.

चीनच्या काही लोकांनी ट्रेडिशन डाएट आणि दूध मिळणाऱ्या पोषणाची तुलना करत आहेत. चीनच्या पारंपारिक खाण्यापिण्यामध्ये एनिमल प्रोटीन जास्त असते. तसेच काही जणांचे म्हणणे आहे की, खाण्यापिण्यातील कोणत्याही प्रकारचा बदल कोरोना व्हायरस होण्यापासून वाचवू शकत नाही आणि डाएटमध्ये प्रोट्रीन सामिल करण्यासाठी अनेक पद्धती आहेत, असे म्हणत दूध पिण्यास अनेक जण विरोध दर्शवत आहेत. मात्र आता चीन सरकारने २०२५ पर्यंत ४५० टन दूध उत्पादन करण्याचे लक्ष केंद्रीत केले आहे. जे आतापर्यंतच्या उत्पादनापेक्षा ३० पट आहे. चीनमध्ये गायींच्या देखभाल आणि त्यांच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sputnik Light ने आणला कोरोनाविरोधी सिंगल डोस, लस ८० टक्के प्रभावी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -