घरताज्या घडामोडीविनामास्क रक्तदान करायला गेलेल्या सोनू निगमला केलं नेटकऱ्यांनी ट्रोल,पहा काय म्हणाले

विनामास्क रक्तदान करायला गेलेल्या सोनू निगमला केलं नेटकऱ्यांनी ट्रोल,पहा काय म्हणाले

Subscribe

'तु रक्तदान करायला गेलास, खरंतर तुला कोणीतरी मास्कदान करायला पाहिजे होते', असे म्हणत सोनू निगम ट्रोल

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यासह देशात कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. लसीकरण करण्याआधी रक्तदान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. येत्या काळात देशात रक्ताचा मोठ्या प्रमाणाच तुटवडा निर्माण होईल सांगण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर काही काळ रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करण्याआधी एकदा रक्तदान करा असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. सामान्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटीही कोरोनाच्या महामारीत सरकारला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. कोरोनाच्या काळाचा अनेक सेलिब्रेटींनी देशाला मोठी मदत केली. गायक सोनू निगमही मदत करण्यासाठी पुढे आला. कर्तव्य म्हणून सोनू रक्तदान करण्यासाठी गेला होता. मात्र रक्त दान केल्याचे कौतुक करण्याऐवजी सोनूला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

गायक सोनू निगम लवकरच कोरोना लस घेणार असल्याने लस घेण्याआधी रक्तदान करण्याचा निर्णय सोनूने घेतला. रक्तदान करण्याआधी सोनूने आवाहन करणारा एक व्हिडिओ देखिल शेअर केला. त्यानंतर त्याने रक्तदान करतानाचे आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र त्यात सोनूने मास्क घातला नव्हता. विनामास्क रक्तदान करायला गेलेल्या सोनू निगमला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

- Advertisement -


सोनूला विनामास्क रक्तदान करायला गेलेला पाहून नेटकरी चांगलेच संतापले. ‘तु रक्तदान करायला गेलास, खरंतर तुला कोणीतरी मास्कदान करायला पाहिजे होते’, असे म्हणत सोनू निगमला सध्या ट्रोल करण्यात येत आहे. ‘तुमचं कार्य खुप छान आहे पण रक्तदान करायला जाताना मास्क न घालणे हे बरोबर नाही’,अशा कमेंटही युझर्सनी केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

- Advertisement -

येत्या काळात देशात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार आहे असे आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतापासूनच तयारी लागा. ‘मी रक्तदान केले आहे तुम्हीही रक्तदान करा’, असे आवाहन सोनू निगमने त्याच्या चाहत्यांना केले आहे.


हेही वाचा – नोराचा हॉट डान्स परफॉर्मन्स,‘हाय गर्मी’वर नोरा फतेहीने धरला लावणीवर ठेका.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -