Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही; पडळकरांच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचं समर्थन

पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही; पडळकरांच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचं समर्थन

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुले4आरक्षण मिळालं नाही, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. या वक्तव्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलं आहे. शरद पवार हे सगळ्याचे गॉडफादर आहेत. ठाकरे सरकारचे ते मार्गदर्शक आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

मराठा आरक्षणप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचल्यावर किती दिरंगाई झाली ते समजतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पुढे म्हणाले, “गोपीचंद पडळकरांनी काही भूमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी डिबेट करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला-पावलावर जाणवतंय की चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही.”

- Advertisement -

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केलं. ३ जून २०१४ रोजी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले. आज ७ वर्ष झाली. भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -