Coronavirus India Update: देशात २४ तासांत ५१,६६७ नव्या रुग्णांची नोंद; १,३२९ जणांचा मृत्यू

Lowest death rate in year and a half in mumbai
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २ वर, दीड वर्षात सर्वात कमी मृत्यू दर

गेले दोन दिवस देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ होत होती. मात्र आज तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ५१ हजार ६६७ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ३२९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६४ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १ लाख ३४ हजार ४४५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ९३ हजार ३१० जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ९१ लाख २८ हजार २६७जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्या ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३० कोटी ७९ लाख ४८ हजार ७४४ जणांचा लसीकरण पार पडले आहे.

२४ जूनपर्यंत देशात ३९ कोटी ९५ लाख ६८ हजार ४४८ नमुन्यांच्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १७ लाख ३५ हजार ७८१ नमुन्यांच्या चाचण्या काल, गुरुवारी दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

दरम्यान बुधवारी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येने १० हजारांचा आकडा पार केला असून राज्यात १० हजार ६६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर गुरुवारी बाधितांमध्ये काहिशी घट झाल्याचे बघायला मिळाले. गुरुवारी ९ हजार ८४४ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ६० लाख ७ हजार ४३१ झाला आहे. तर बुधवारी १६३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर गुरुवारी कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असून १९७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे.