Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश coronavirus : कोरोनाविरोधी 'हे' स्टेरॉईडस शरीरात विषाणूचे संक्रमण वाढवताहेत, AIIMS च्या डॉक्टरांचा...

coronavirus : कोरोनाविरोधी ‘हे’ स्टेरॉईडस शरीरात विषाणूचे संक्रमण वाढवताहेत, AIIMS च्या डॉक्टरांचा दावा

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. राज्यांतील अनेक रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांअभावी रुग्णांचा जीव जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहिले पाहिजे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण लवकर बरे होण्यासाठी औषधांचा किंवा स्टेरॉईटचा ओव्हर डोस घेत आहेत, त्यामुळे रुग्णाचा आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया सांगतात, सिस्टमॅटिक स्टेरॉईडसचा ओव्हर डोसमुळे रुग्णांचा जीवाला धोका निर्माण होतो. दरम्यान संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात जर रुग्ण कोणतीही औषधे प्रमाणाबाहेर घेत असतील तर फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोरोना संक्रमणादरम्यान औषधांचा गैरवापर टाकण्याचा सुचना त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

डॉ. गुलेरिया सांगतात की, अनेक लोकांना वाटते की रेमडेसिवीर आणि स्टेरॉईटस कोरोनातून बरे करण्यासाठी उपयुक्त आहेत. परंतु लोकांना हे माहित नाही की, प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर आणि स्टेरॉईडसची गरजेच नसते. त्यामुळे कोणताही औषधे किंवा स्टेरॉईडस फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दिली जाऊ शकतात. डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले, कोरोना संसर्ग दोन टप्प्यांमध्ये पसरतो प्रथम, जेव्हा शरीरात विषाणूचा प्रसार होतो तेव्हा ताप किंवा गुदमरल्यासारखे होते. बर्‍याच वेळा जेव्हा विषाणू फुफ्फुसांमध्ये पसरण्यास सुरु होते तेव्हा शरारातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. यावेळीच कोरोनाविरोधी औषधे दिली जातात.

तर दुसऱ्य़ा टप्पात कोरोना संक्रमित व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती थांबते आणि शरीरात गंभीर परिणाम जाणवू लागतात. अशावेळी रुग्णांना स्टेरॉईट्सची आवश्यकता असते. परंतु जर स्टेरॉईट्स सुरूवातीच्या स्टेजमध्येच दिली गेली तर शरीरात विषाणूचे संक्रमण वाढू शकते. म्हणजेच, शरीरातील विषाणू त्यांची संख्या अधिक वेगाने वाढवू शकतो. कोरोना संसर्गानंतर लगेचच रुग्णांचे सीटी स्कॅन केले जात आहे. त्यामुळे सीटी स्कॅन चाचणीचे दर वाढले आहेत. यासंदर्भात डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोना संसर्गाचा सुरुवातीच्या टप्प्यात सीटी स्कॅन रिपोर्ट केल्यास काहीच उपयोग होत नाही. कारण संसर्ग हळहळू फुफ्फुसांपर्यंत पोहचतो. तसेच एका सीटी स्कॅनमध्ये 300 एक्सरे इतके रेडिएशन असते. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

- Advertisement -

छातीच्या एक्स-रे नंतरच डॉक्टर आवश्यक असल्यास सीटी स्कॅन करायचे आहे किंवा नाही असा सल्ला देऊ शकतात. तसेच बायो-मार्कर्स म्हणजेच रक्ताची चाचणीही आपल्या मनाने करु नका. आणि स्वत: चं स्वत:चे डॉक्टर बनू नका. बरेच लोक दर तीन महिन्यांनी आपल्या मनाप्रमाणे सीटीस्कॅन रिपोर्ट आहे. परंतु हे अगदी चुकीचे आहे.


 

- Advertisement -