Eco friendly bappa Competition
घर CORONA UPDATE Omicron Variant: चांगली बातमी! ओमिक्रॉनविरोधात मार्चमध्ये तयार होणार लस

Omicron Variant: चांगली बातमी! ओमिक्रॉनविरोधात मार्चमध्ये तयार होणार लस

Subscribe

Pfizer चे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने सरकारकडून लसीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे Pfizer कंपनी आधीच लसीचे डोस तयार करत आहे. मात्र लसीकरण पूर्ण झालेले लोकंही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे शिवार होत असल्याची आकडेवारी मोठी आहे.

कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट भारतासह जगातील सर्व देशांमध्ये वेगाने पसरतोय. या व्हेरिएंटमुळे निर्माण होणार भविष्यातील धोका लक्षात घेत अनेक देशांनी नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधातील लसीवरही काम सुरु आहे. यातच लस निर्मिती उद्योगातील फायझर या दिग्गज फार्मा कंपनीने ओमिक्रॉनविरोधात मार्चमध्ये लस तयार होणार अशी आशा व्यक्त केली आहे. कंपनीच्या प्रमुखांनी सोमवारी ही माहिती जाहीर केली आहे.

Pfizer चे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने सरकारकडून लसीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे Pfizer कंपनी आधीच लसीचे डोस तयार करत आहे. मात्र लसीकरण पूर्ण झालेले लोकंही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे शिकार होत असल्याची आकडेवारी मोठी आहे.

- Advertisement -

त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मार्चमध्ये लस तयार होईल. मात्र याची कितपत आवश्यकता आहे याची मला माहिती नाही. किंवा ती लस कशी वापरली जाईल हे मला माहीत नाही, असंही बोएर्ला म्हणाले.

फायझरचे सीईओ म्हणाले की, दोन लसींचे डोस असणारी व्यवस्था आणि एक बूस्टर डोस हा ओमिक्रॉनमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणामांपासून संरक्षण प्रदान करते. तथापि, ओमिक्रॉन व्हेरिएंटला थेट लक्ष्य करणारी लस स्ट्रेनच्या ब्रेकथ्रू इंफेक्शनपासून देखील संरक्षण करेल, जी अत्यंत संसर्गजन्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बंसेल म्हणाले की, कंपनी एक बूस्टर डोस विकसित करत आहे जो ओमिक्रॉन आणि इतर नव्या स्ट्रेनचा सामना करू शकतो. मात्र संभाव्य बूस्टरसाठी ते जगभरातील आरोग्य क्षेत्रातील दिग्गजांशी बोलत आहेत.


Corona in India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; 24 तासात 1,68,063 नवे रुग्ण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -