घरCORONA UPDATECovid 19 : आतापर्यंतची सर्वात वाईट जागतिक आणीबाणी; WHO ने केली चिंता...

Covid 19 : आतापर्यंतची सर्वात वाईट जागतिक आणीबाणी; WHO ने केली चिंता व्यक्त

Subscribe

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात १ कोटी ६० लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेदरोस अदहानोम गेब्रियस यांनी ही जगातील आतापर्यंकची आरोग्याच्या दृष्टीने सर्वात वाईट आणीबाणी असल्याचे म्हटले आहे. ऑनलाईन माहिती देताना तेदरोस यांनी सांगितले की, मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे यासारखे उपायच कोरोना संसर्ग होण्यापासून रोखू शकतात. कॅनडा, चीन, जर्मनी आणि दक्षिण कोरियामधील कोविड – १९ वर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी सांगितले की, जिथे या नियमांचे पालन केले जाते, तिथे कोरोनाचे रूग्ण कमी आढळतात. तसेच जिथे आरोग्याचे उपाय पाळले जात नाहीत तिथे रूग्णवाढ झपाट्याने होत आहेत.

काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ६ लाख ५० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. WHO आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख माईक रायन यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी देशांना त्यांच्या हॉटस्पॉटमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, हे आता स्पष्ट झाले आहे की कोरोना व्हायरसच्या विरोधात जितक्या गांभिर्याने काम करू तितका हा व्हायरस लवकर नष्ट होणार आहे. मात्र तुम्ही याबाबतीत गांभिर्य पाळले नाही तर व्हायरस पुन्हा आपली पाळेमुळे जलद गतीने पसरवेल, त्यामुळे लोकांनी आरोग्याच्या संबंधीचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

COVID 19 tests : देशात २४ तासात ५ लाखांहून अधिक चाचण्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -